News34 ncp chandrapur
चंद्रपूर – राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडत अजित पवार यांनी भाजप व शिंदे गटासोबत हातमिळवणी करीत सत्तेत सहभागी झाले, अजित पवार यांच्या निर्णयाने अनेक बडे नेते शरद पवार गटाला रामराम करीत निघून गेले.
अजित पवार गटाने चंद्रपुर जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली असून राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष राजीव कक्कड सहित शहर राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेत नागपुरातील कार्यक्रमात रीतसर अजित पवार गटात प्रवेश घेतला.
अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी नितीन भटारकर यांना चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी तर राजीव कक्कड याची शहर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली.
मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात गटबाजी सुरू होती, अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजप-सेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण होणार तरी कसे याबाबत अनेक पदाधिकारी चिंतेत होते, व मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे राजेंद्र वैद्य यांच्याकडे असल्याने नव्या नेतृत्वाला संधी मिळत नव्हती म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार गटाचे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी राष्ट्वादी युवक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नितीन भटारकर व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांच्या अजित पवार गटात गेलेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, मात्र त्यांच्यासोबत किती तालुक्याचे पदाधिकारी गेले हे त्यांनी जाहीर करायला हवं, आज शरद पवार गटाचे जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी आमच्या सोबत आहे, बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी पक्षाला सोडून गेले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, उलट आम्ही चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देऊ.
त्यांचा पक्षप्रवेश हा फुसका बार ठरला आहे, जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते शरद पवार यांची साथ सोडणार नाही, सर्व पक्षासोबत एकनिष्ठ पदाधिकारी आहे, चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाला आता चांगले दिवस येणार हे निश्चित आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाचे नवे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी दावा केला की आमच्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्याचे पदाधिकारी आहे, मात्र त्यांचा दावा हा फुसका असल्याचे मत शरद पवार गट राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी मांडले आहे.
जर त्यांच्यासोबत 12 तालुक्याचे पदाधिकारी असे तर त्यांनी नाव जाहीर करावे, आमच्यासोबत असलेल्या एकही पदाधिकारी हा अजित पवार गटात गेला नाही.