News34 chandrapur
ब्रह्मपुरी – आधुनिक युगामध्ये जुन्या रूढी परंपराना तिलांजली देत सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानतेने कार्य करीत असुन आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनी देखील गगनभरारी घेतली आहे. हाच उदात्त हेतू साधत ग्रामीण महिला कुस्तीपटुंना वाव मिळावा याकरिता शिक्षणाची पंढरी असलेल्या ब्रम्हपुरी नगरीत राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचा दर्शनीय उद्घाटन सोहळा आज थाटात पार पडला.
आयोजित उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, माजी जि.प. अध्यक्ष सतीश वारजूरकर, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, सौ. किरण विजय वडेट्टीवार, नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे, न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नंदु नागरकर, प्रवीण पडवेकर, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शरद टेकुलवार, कुस्तीगीर संघाचे सचिव मुर्लीधर टेकुलवार, विजय नडे, मतीन कुरेशी, राजेश सोलापन, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, गजानन शिरसागर, चंद्रशेखर पडगिलवार, नरेंद्र गाडगिलवार, विनोद दिवटे, चंद्रशेखर पडगिलवार यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार म्हणाले की, आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून 600हुन अधिक महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला आहे. तर देशाच्या पारंपारिक क्रिडांपैकी एक असलेल्या कुस्ती स्पर्धेत कौशल्याची छाप सोडणाऱ्या विजेत्यांना राष्ट्रीय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेतून महिलांचे सक्षमीकरण व्हावे हा यामागील मुळ हेतू असुन जिल्ह्यात शिक्षणाची पंढरी व वैद्यकीय नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरी नगरीला नावलौकिक मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी कटीबध्द आहोत असेही ते यावेळी म्हणाले.
सुत्रसंचलन सुरज मेश्राम, प्रास्ताविक विनोद दिवटे, आभारप्रदर्शन संजय कुमरे यांनी केले.
महाराष्ट्र केसरी गदा व मेडलचे पुजन
ब्रम्हपूरी येथे सुरू होणाऱ्या महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस म्हणून देण्यात येणार असलेल्या महाराष्ट्र केसरी गदा व मेडलचे विधीवत पूजन कार्यक्रम राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी त्यांनी शक्तीची देवता बजरंगबली हनुमानजींच्या मुर्तीची सुध्दा पुजा केली.
याप्रसंगी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, तहसीलदार उषा चौधरी, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शहरातुन निघाली कुस्तीपटुंची रॅली
ब्रम्हपूरी शहरातील मुख्य मार्गावरून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कुस्तीपटुंना सहभागी करत रॅली काढण्यात आली. रॅलीचे नेतृत्व सलग दोनदा महाराष्ट्र केसरी बहुमान मिळवणारे शिवराज राक्षे यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार ह्या उपस्थित होत्या.