Telecommunications गुरू गुरनुले मुल – भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुलं नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांची दुरसंचार मंत्रालय भारत सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली.
अवश्य वाचा : पाण्यासाठी शिवसैनिक आक्रमक, ताबा सुटला अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले गढूळ पाणी
Telecommunications नंदकिशोर रणदिवे हे मुलं तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आहेत. सोबतच त्यांनी मुलं नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणुनही कामकाज बघितले आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा दुरसंचार विभागातील अडचणी आणि दुरसंचार विभागाच्या ग्राहकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडण्यासाठी त्याच्या अनुभवाचा फायदा व्हावा हया उद्देशाने त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारीं सोपवीण्यात आली.
त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष नाम. हंसराज अहिर यांना दिलें आहे. नंदकिशोर रणदिवे यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले असुन त्याचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. रणदिवे हे मागील अनेक वर्षांपासून भाजप पक्षात सक्रियपणे काम करीत आहे, त्यांची कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा बघता त्यांना त्या कामाचे फळ मिळाले आहे.
नंदकिशोर रणदिवे हे नाव मूल तालुक्यातील सर्वांना परिचित असलेले नाव आहे, राजकारण असो की समाजकारण यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो, रणदिवे हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम बघतात, त्यांनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मूल तालुक्यातील भाजप पदाधिकारी सदस्यांनी त्यांचा अभिनंदन मारीत भविष्यातील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.
दुरसंचार विभागातील नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्यांनी मला थेट संपर्क करावा असे आवाहन रणदिवे यांनी केले आहे.