Ekvira mandir चंद्रपूर – येत्या 22 तारखेला रामजन्मभूमी अयोध्या येथे श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे, त्यापूर्वी देशातील श्रद्धास्थान असलेले मंदिर स्वच्छ करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले होते.
Ekvira mandir पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला साद देत चंद्रपुरात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 19 जानेवारीला सायंकाळी एकोरी वार्डातील एकविरा मातेच्या मंदिरात स्वछता अभियान राबविले.
राजकीय : दिक्षाभूमीच्या विकासासाठी 56 कोटींचा निधी मंजूर
देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा उत्साह दिसून येत आहे, देशातील श्रद्धास्थान असलेली मंदिरे नागरिक स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छ करीत आहे, अनेक वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित होता, मात्र निकाल राम मंदिर च्या बाजूने लागल्याने अयोध्या मध्ये श्री राम यांचं भव्य मंदिराचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले आहे, 22 जानेवारीला श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
देशात सर्वत्र राम मय वातावरण व्हावे यासाठी सर्वत्र मंदिराची स्वच्छता होत आहे, हे मात्र विशेष.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, माजी शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांना धार्मिक स्थळांची स्वच्छता करीत अभियान राबविण्याचे आवाहन केले.
त्यांच्या आवाहनाला साथ देत चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व नेते यांनी जिल्ह्यातील विविध भागात असणारे धार्मिक स्थळात स्वच्छता अभियान राबविले.
मोदी यांच्या या अभियानाला भाजप नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे.