Ram Bhakt चंद्रपूर – चंद्रपूरकर रामभक्त सायकलपटूने अयोध्यावारीची सुरुवात केली आहे. २० वर्षाचा मयूर देऊरमल्ले रामललाच्या दर्शनाला सायकलीने रवाना झालाय. सुमारे हजार किलोमीटर अंतर पार करून दहा दिवसांनी तो अयोध्येला पोचणार आहे.
चंद्रपूर शहरातील जीवघेणे खड्डे बुजवा
Ram bhakt अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने जय श्रीराम चा जयघोष करत अयोध्येकडे निघालेल्या सायकलपटू रामभक्ताला चंद्रपूरकरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
मयूर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील धनोटी या गावातील रहिवासी आहे. श्रीरामाच्या ओढीने व त्यांच्याच कृपाशीर्वादाने सर्व विघ्न दूर होत अयोध्येला सुखरूप- सकुशल पोहचू असा विश्वास त्याने व्यक्त केला.
अयोध्या येथे श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा दरम्यान देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यानिमित्ताने नागरिक आपल्या परीने कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे, मात्र चंद्रपुरातील मयूर हा थेट सायकलने अयोध्येच्याया दिशेने निघाला आहे, हजारो किलोमीटर चा प्रवास हा मयूर सायकलने करणार आहे.
त्याच्या 10 दिवसाच्या या भक्तिमय प्रवासात तो जय श्री राम चा नारा लावत अयोध्येला पोहचणार, मयूर हा पोम्भूर्णा तालुक्यातील रहिवासी आहे, रामा च्या भक्तीमध्ये तल्लीन होत आज तो अयोध्येसाठी रवाना झाला आहे, त्याचा हा प्रवास सुखकर होवो अश्या शुभेच्छा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी दिल्या आहे.
मयूरच्या या प्रवासात अनेक जिल्हे व राज्य येणार आहे, सतत 10 दिवस तो विविध ठिकाणी थांबणार आहे, विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी मयूर च्या प्रवासात अडचणी येऊ नये यासाठी त्यांनी राम मय शुभेच्छा दिल्या आहे.