News34 chandrapur
चंद्रपूर – शहरातील वेकोली चंद्रपूर क्षेत्राच्या रयतवारी उपक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डीआरसी क्रमांक 3 कोळसा खाणी च्या मागील बाजूस नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. Encroachment
सदर जागा ही वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड यांची आहे, त्याठिकाणी आज 22 फेब्रुवारीला वेकोलीच्या वतीने अतिक्रमनावर बुलडोजर चालविला.
काही काळ त्याठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती, वेकोलीने सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावला होता, काही नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक सुद्धा केली असल्याची माहिती पुढे आली आहे. Chandrapur wcl
वेकोलीच्या जागेवर नागरिकांनी कच्च व पक्के बांधकाम केले होते, वेकोलीने आज पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केले. Chandrapur news
काही नागरिकांनी वेकोलीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा विरोध करीत गरिबांचे घरे तोडत इतरांनी केलेले अतिक्रमण वाचविले अशी चर्चा दबक्या आवाजात केली.
विशेष बाब म्हणजे मागील अनेक महिन्यापासून नागरिकांनी या ठिकाणी बस्तान मांडले होते, त्याकरिता वेकोली मधील काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार केल्याची माहिती मिळाली आहे. Chandrapur district
वेकोलीच्या या जागेवर 8 ते 9 महिन्यापासून अतिक्रमण सुरू होते मात्र त्यावेळी वेकोलीने कारवाई का केली नाही? आताही त्याठिकाणी काही मोठे अतिक्रमण धारक आहे त्यांच्या बांधकामावर वेकोलीने अद्यापही बुलडोजर चालविला नाही, वेकोलीच्या या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
काही अतिक्रमण धारकांनी नाव न सांगण्याचा अटीवरून आम्हाला इथे घरे उभारण्यासाठी वेकोली कर्मचारी व राजकीय पुढाऱ्यांनी आर्थिक व्यवहारही केला आहे. कुणी 50 तर कुणी 80 हजार रुपयांमध्ये त्याठिकाणी बस्तान मांडण्यासाठी पैसे दिले होते.
वेकोलीच्या वेळकाढुपणामुळे आज या अतिक्रमनावर बुलडोजर चालविण्यात आला त्यामुळे 30 ते 40 परिवार उघड्यावर पडले.