Manohar joshi चंद्रपूर – मुंबईत महानगरपालिकेत नोकरी ते मुख्यमंत्री अशा सर्वच पदांवर विराजमान झालेले माननीय डॉक्टर मनोहर जोशी यांच्या आज निधनाने राजकीय आदर्श हरपला असल्याची भावना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली.
राजकीय ; भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला कांग्रेसने मारले जोडे
Manohar joshi शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून लढलेला हा नेता काळाच्या पडद्याआड जाणे हा आम्हा सर्व लोकप्रतिनिधीं साठी मोठी दुःखद घटना आहे. भविष्यात त्यांच्या कर्तुत्वाचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन वाटचाल करणार आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतीप्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कोण होते मनोहर जोशी?
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट. त्यामुळे त्यांचं आयुष्याचा प्रवास खडतर राहिला. वडील भिक्षुकी मागायचे. मनोहर जोशी यांनीही भिक्षुकीतून मागून कुटुंबाला हातभार लावला.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं चौथीपर्यंतच शिक्षण नांदवीला झालं. पाचवीचं शिक्षण महाड, तर सहावीनंतर ते मामाकडे पनवेलला आले. मामाची बदली झाल्यानंतर ते गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करू लागले. या काळात ते मित्राच्या खोलीत राहत होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था महाजन बाईंकडे होती.
पुढे मनोहर जोशी ११ वीच्या शिक्षणासाठी मुंबईतील बहिणीकडे आले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये त्यांनी शिपायाची नोकरी केली आणि शिक्षण घेतले. नंतर किर्ती कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली. शिक्षण सुरू असतानाच मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून काम सुरू केले. पुढे वयाच्या २७व्या वर्षी एम.ए, एल.एल.बीची पदवी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोहर जोशी यांनी वयाच्या ७२व्या वर्षी पीएच.डी पूर्ण केली. शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी मिळवली होती. पुढे डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट ही मानद पदवीही प्रदान करण्यात आली होती.
बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मनोहर जोशी हे शिवसेनेकडे खेचले गेले. 1967 पासून त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. पक्षाचे काम करत असताना ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. दोन वेळा ते नगरसेवक राहिले.
नंतर सलग तीन वेळा ते विधान परिषदचे आमदार राहिले. पुढे १९७६ मध्ये ते मुंबई महापालिकेचे महापौर झाले. पुन्हा त्यांची पाऊले राज्याच्या राजकारणात पडली आणि ते आमदार म्हणून विधानसभेत गेले. पुढे ते १९९०-९१ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.