500 khoke ekdam ok slogan : चंद्रपुरात लागले 500 खोके एकदम ओके चे नारे

500 khoke ekdam ok slogan 100 कोटींची फसलेली जुनी भूमिगत गटार योजनेची तसेच 506 कोटी रूपयांच्या नवीन भूमिगत गटार योजनेतील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर रामनगर पोलिसांनी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांना ताब्यात घेतले.

 

 

यानंतर जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी 3 वाजे दरम्यान गांधी चौकातील महानगरपालिकेच्या इमारतीसमोर काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. अशाप्रकारे प्रशासनाचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जनविकासच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून शासन व प्रशासनाचा निषेध या कार्यकर्त्यांनी केला. 500 khoke ekdam ok slogan

वाचा – चंद्रपूर झाले हत्या “पूर”, जिल्ह्यात हत्या क्रमांक 15

जनविकासच्या कार्यकर्त्यांनी ‘जुन्या गटार योजनेचे 100 खोके एकदम ओके,’नविन गटार योजनेचे 500 खोके एकदम ओक्के, ‘पहिल्या अमृत योजनेचे 225 खोके एकदम ओक्के’, ‘नविन अमृत योजनेचे 270 खोके एकदम ओके’,’चंद्रपूरकरांना खड्डे आणि धुळीचे धोके एकदम ओके’,’च्या आयला, आम्हाला पाणी नाही
प्यायला,धड नाली नाही, सांडपाणी वाहायला
आणि तुम्हाला करोडो मिळतात खायला’ अशा लक्षवेधी नाऱ्यांनी जनविकासच्या कार्यकर्त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 500 khoke ekdam ok slogan

 

पोलिसांनी देशमुख यांना अटक केल्यानंतर जनविकासच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने मनपाच्या इमारती समोरआंदोलन केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!