6 Deportation of criminals : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 गुन्हेगार हद्दपार

6 Deportation of criminals चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुरक्षा अबाधित रहावी यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे, पोलिसांनी एका महिन्यात तब्बल 6 जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.

 

शरीर व मालमत्ते विरुद्धचे सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई चा आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पारित केला असून पहिल्या आदेशात चंद्रपूर शहर हद्दीतील शुभम अमर समुद, नैनेश उर्फ लाला नितीन शहा व वरोरा येथील मोहशन केशव कुचनकर यांना कलम 56(१)(अ)(ब) महाराष्ट्र पोलीस कायदानव्ये 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते. 6 Deportation of criminals

हे ही वाचा – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आता 15 उमेदवार यांच्यात होणार लढत, चिन्हाचे वाटप

या आठवड्यात बल्लारपूर येथील दर्शन उर्फ बापू अशोक तेलंग, नागभीड येथील मुनिर खान वहीद खान पठाण, ब्रह्मपुरी येथील शिवशांत उर्फ भिस्सु दामोदर भुर्ररे यांना 3 व 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. 6 Deportation of criminals

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात नाओमी साटम उपविभागीय पोलीस अधिकारी, सुधाकर यादव चंद्रपूर पोउपवि अधिकारी, दीपक साखरे, दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, आसिफ रजा, अनिल जित्तावार, विजय राठोड यांनी केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!