A live newborn was found तळोधी (बा) – नागभीड तालुक्यातील तळोधी जवळील बाळापूर येथील विनोद गोंगल यांच्या घराच्या मागच्या बाजुला तुराटीच्या खाली नवजात बालक आढळल्याची धक्कादायक घटना 18 मार्च सोमवार ला सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
वाचा – चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांचं भव्य स्वागत
यावेळी सदर बाब जवळील तळोधी (बाळापूर) येथील पोलीस स्टेशन ला माहीती दिली असता लगेच
ठाणेदार अजितसिंग देवरे व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बालकाला प्राथमिक उपचाराकरिता बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. A live newborn was found
सदर बालक हा नुकताच जन्माला असून जन्मानंतर त्याची आई त्याला तुराट्यांच्या ढिगाखाली ठेवून फरार झाली. सध्या बालकावर चंद्रपूर जिल्हा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुढील तपास तळोधी बाळापूर पोलीस करीत आहेत.