Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave : निवडणुकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी – शिवानी वडेट्टीवार

Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave

चंद्रपूर – Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून राज्यात प्रचलित आहे, मात्र जिल्ह्यात आज स्थानिकांना रोजगार मिळत नाही आहे, मात्र या धर्तीवर जिल्ह्यातील नेते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी 4 मार्च रोजी चंद्रपुरात दोन दिवसीय ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह‘ चे आयोजन करण्यात आले आहे अशी टीका युवक कांग्रेसच्या प्रदेश सचिव, विजयक्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात आज भूमिपुत्र रोजगार नसल्यामुळे घरी बसला आहे, त्यांना आधी रोजगार मिळावा मात्र आजच्या विपरीत परिस्थितीत बाहेरच्यांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे, आज ज्या पद्धतीने कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे, तो भूमिपुत्र यांना रोजगार कसा मिळेल यावर खर्च करायला हवा असा प्रश्न शिवानी वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

वाचा – ताडोबा महोत्सवातील VIP कोण?

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave चे आयोजन करण्यात आले आहे, मात्र आज त्यांना सुद्धा युवा नेत्याच्या टिकेला समोर जावे लागत आहे.

 

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेली ही स्टंटबाजी आता बंद करावी अशी टीका शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे. चंद्रपुरात असलेले उद्योग यामध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा मग नवे उद्योग आणावे, कार्यक्रमात कोणते उद्योग येणार आहे त्याबाबत सुद्धा काही सांगण्यात आले नाही हे विशेष.

 

4 मार्च पासून चंद्रपुरात कार्यक्रम

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave’ चे उद्घाटन सोमवार दि. 4 मार्च रोजी होणार आहे.

चंद्रपूर वन अकादमी येथे सकाळी 11 वाजता होणा-या या कार्यक्रमाला केंद्रीय रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे.

 

विविध सत्रांचे आयोजन : दि.4 मार्च रोजी वन अकादमी येथील प्रभा सभागृहात  दुपारी 2.30 वाजता ‘आर्यन अँड स्‍टील’ विषयावर तर दुपारी 4.30 वाजता ‘मायनिंग अँड कोल’ विषयावर तसेच सिद्धांत हॉलमध्‍ये दुपारी 2.30 वाजता ‘अल्‍टरनेटीव्‍ह एनर्जी सोर्सेस’ या विषयावर आणि दुपारी 4.30 वाजता होणा-या ‘अॅग्रीकल्‍चर अँड अलाइड सेक्‍टर्स’ या विषयावर चर्चासत्र आयोजित आहे.

 

5 तारखेला प्रभा हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता ‘एफआयडीसी अँड बांबू’ व दुपारी 12.30 वाजताच्‍या ‘बांबू इंडस्‍ट्री’ या विषयावर, दुपारी 3.00 वाजता ‘एज्‍युकेशन अँड स्‍कील डेव्‍हलपमेंट’ या विषयावर, सिद्धांत हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता ‘फायनान्‍स अँड स्‍टार्टअप’ दुपारी 12.30 वाजता ‘सर्क्‍युलन इकॉनॉमी’ वर तर दुपारी 3.00 वाजता होणा-या ‘सिमेंट अँड लाईमस्‍टोन’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता विपिन पालिवाल यांचे मोटिव्‍हेशनल टॉक होईल.

 

या मेगा एक्स्पोला महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून तसेच परदेशातील व्यापारी, उद्योगपती, उद्योजक, नोकरी-उत्सुक, एमएसएमई, व्यवसाय, उद्योग तज्ञ आदींची उपस्‍थ‍िती राहणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!