Tiger Attack in chandrapur : चंद्रपुरात पुन्हा वाघाचा हल्ला

tiger attack in chandrapur चंद्रपूर/बल्लारपूर – उन्हाळा सुरू झाला की जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचतो, एकतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलातून शहरात येतात तर दुसरीकडे नागरिक लाकडाच्या शोधात जंगलात जातो.

 

बल्लारपूर शहरातील रवींद्र नगर वार्ड येथे राहणारे 67 वर्षीय नामदेव आत्राम हे 13 मार्च ला कारवा जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेले होते, मात्र दिवस उलटल्यावर ते घरी परतले नाही, याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली, वनविभागाला याबाबत कळविण्यात आले, त्यानंतर वनविभागाच्या चमूने कारवा जंगलात आत्राम यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. tiger attack in chandrapur

 

वाचा – सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव

जंगलाच्या 2 किलोमीटर अंतरावर नामदेव आत्राम यांचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला, सदर हल्ला हा वाघाने केल्याचा अंदाज वनविभागाने लावला आहे, आत्राम यांचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

सध्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी घटना परिसरात कॅमेरे व पिंजरे लावण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली आहे.

 

वाचा – चंद्रपुरातून आता थेट मुंबई रेल्वे ला सुरुवात

सदरची पुढील कारवाई पोलीस निरीक्षक आसिफ रजा व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहे. 13 मार्च ला बल्लारपूर येथे 7 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करीत तिला जखमी केले होते

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!