Assault on Yuvasena city chief : युवासेना शहरप्रमुखावर प्राणघातक हल्ला

Assault on Yuvasena city chief

चंद्रपूर – Assault on Yuvasena city chief 25 फेब्रुवारीला राजुरा येथील दसवारू नाल्याजवळील पाहुणचार या हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी मज्जाव केल्याने चार युवकांनी हॉटेल मालक व उबाठा युवासेना शहर प्रमुख स्वप्नील मोहूर्ले यांच्यावर चाकूने हल्ला केला होता, या प्रकरणी पोलिसांनी योग्यरीत्या कारवाई न केल्याने 2 दिवसात आरोपी बाहेर आले, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करीत आरोपीवर कारवाई करावी असे निवेदन युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिले.

 

4 मार्च ला युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत निवेदन दिले, युवासेना शहरप्रमुख स्वप्नील मोहूर्ले यांच्यावर (Assault on Yuvasena city chief) चाकूने वार केला होता, या हल्ल्यात स्वप्नील च्या किडणीजवळ मार लागला, मात्र पोलिसांनी या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीवर कलम 324, 326 अंतर्गत गुन्हे दाखल झाले, मात्र या प्रकरणात कलम 307 अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला हवे होते पण पोलिसांनी ते दाखल केले नाही, आणि 2 दिवसांनी ते आरोपी बाहेर आले.

 

यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात दखल घेत चौकशी करून आरोपीवर कारवाई करावी, कारण आरोपीना न्यायालयात हजर केल्यावर सुद्धा त्यांची साधी पोलीस कस्टडीची मागणी राजुरा पोलिसांनी केली नाही, या सर्व कारणावरून राजुरा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत आहे असे निवेदन युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!