Bablu Katre’s entry into BJP लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते व पदाधिकारी पक्ष बदलवित असतात या पार्श्वभूमीवर ठाकरे गट शिवसेनेचे माजी पदाधिकारी बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
वाचा – चंद्रपुरातील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मधून निवडणूक लढत थेट सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान देणारे शिवसेनेचे माजी कामगार सेना जिल्हाप्रमुख बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. Bablu Katre’s entry into BJP
वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
वर्ष 1993 पासून शिवसेनेत तब्बल 30 वर्षे काम करणारे बबलू कटरे यांनी शाखा प्रमुख, दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंच ते कामगार सेना जिल्हाप्रमुख पदापर्यंत मजल मारली. Bablu Katre’s entry into BJP
वाचा – राजेश बेले यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश
विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कटरे यांनी थेट सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात निवडणूक लढली होती.
यावेळी कटरे यांच्याशी संपर्क केला असता मी 30 वर्ष शिवसेना पक्षात काम केले, अनेक पदे पण भूषवली मात्र आज शिवसेना सोडून जाताना मी असंख्य आठवणी सोडून जात आहो अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली, मात्र काही कारणासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतो अशी प्रतिक्रिया कटरे यांनी दिली. Bablu Katre’s entry into BJP
बबलू कटरे यांनी मुनगंटीवार यांच्या उपस्थित आपले सहकारी अतुल कटरे, श्याम वाढई, राजू कटरे सह भाजपात प्रवेश केला, यावेळी मुनगंटीवार यांनी पक्षाचा दुपट्टा कटरे यांच्या गळ्यात टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले.