Bhajan Festival in Different Languages : चंद्रपुरात विविध भाषेत भजन महोत्सव

Bhajan festival in different languages
दरवर्षी प्रमाणे यंदा सुध्दा आपण भजन महोत्सव आयोजित केला आहे. दोन दिवस येथे टाळ, मृदंग वाद्यांच्या साथीत ईश्वराचे गुणवर्णन व नामस्मरण केल्या जाणार आहे. यातून धार्मिकता, सांस्कृतिक आणि सामूहिकतेचे वातावरण निर्माण होणार असुन हाच या आयोजना मागचा उद्देश असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
यंग चांदा बिग्रेडच्या वतीने अंचलेश्वर मंदिर येथे आयोजित विविध भाषीय दोन दिवसीय भजन महोत्सवाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त सूर्यकांत खणके, गुरुदेव सेवा समितीचे ग्रामगितचार्य दादाजी नंदनवार, तालुका प्रचार प्रमूख धनराज चौधरी, गुणवंत चंदनखेडे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, ग्रामीण शहर संघटक मुन्ना जोगी, सविता दंढारे, आशा देशमुख, चंद्रशेखर देशमूख, अस्मिता दोनारकर, सरोज चांदेकर, निलिमा वनकर, वंदना हजारे, गोपी मित्रा, सतनाम सिंह मिर्धा, हेरमन जोसेफ, कार्तिक बोरेवार, विनोद अनंतवार, किशोर बोलमवार, करण नायर, देवा कुंटा, प्रविण कुलटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. Bhajan festival in different languages
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, यंदा या भजन महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. विविध भाषीय भजन मंडळांना एक मोठे व्यासपीठ आपण या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देत आहोत. मतदार संघात विविध विकासकामे होत असतांना असे आयोजनही आवश्यक आहे. भजन मंडळाना एकत्रित आणण्याचे कामही या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात भजन मंडळांचे योगदान आम्हाला लाभले आहे. श्री माता महाकाली महोत्सवातही भजन मंडळे नेहमी सक्रियरित्या समोर आली आहेत. मनाची एकाग्रता, शब्द, अर्थ, विचार, संगीत – स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन, भजनातून परमेश्वराच्या दिव्यशक्तीचे गुणगान, दिव्यशक्तीचे चिंतन, एकाग्रता, आत्मोन्नती, होकारात्मक विचार, मनाचे आरोग्य, बुद्धिचा विकास होते. यातून  आपले दुःख विसरुन  सकारात्मकता निर्माण होते असे ते यावेळी म्हणाले.
यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन आपण अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करत आलो आहे. आता भजन महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रातही ही संघटना आपले योगदान देत असल्याचे समधान आहे. श्री माता महाकाली महोत्सवा नंतर विविध भाषीय भजन महोत्सवही चंद्रपूरची एक परंपरा बनणार आहे. आणि भजन मंडळांच्या सक्रिय सहभागातून हा महोत्सव भव्य होत चालला असल्याचे ते यावेळी म्हणाले. सदर भजन महोत्सवात मराठी, तेलगु, बंगाली, हिंदी, गुजराती, पंजाबी, छत्तीसगडी, गोंडी, मारवाडी यासह अनेक भाषीय 200 हुन अधिक भजन मंडळांनी सहभाग घेतला आहे. Bhajan festival in different languages

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!