Bjp candidate Sudhir Mungantiwar : इच्छा नसताना मुनगंटीवार यांच्या गळ्यात जबरदस्ती लोकसभेची वरमाला

Bjp candidate sudhir mungantiwar 13 मार्च ला भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली या यादीत भाजपने महाराष्ट्र राज्यातील 20 जणांची नावे जाहीर केली होती, चंद्रपुरातून लोकसभेची उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना मिळाल्यावर कही खुशी कही गम चे वातावरण निर्माण झाले आहे.

 

सुधीर मुनगंटीवार यांनी अनेकदा मला लोकसभा उमेदवारी नको, मला लोकसभेत जायची इच्छा नाही असे जाहीर प्रतिक्रिया दिली मात्र पक्षाने आदेश दिल्यास मला लढावे लागेल, आता मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यावर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Bjp candidate sudhir mungantiwar

 

माझी तिकीट मीच कापणार असे म्हणणारे सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची चंद्रपूर जिल्ह्यातून उमेदवारी जाहीर झाली, आता थेट जनता तुमची दिल्लीची वाट कापणार हे येणाऱ्या काळात जनता जनार्दन करेल. अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी 14 मार्च रोजी दिली. Bjp candidate sudhir mungantiwar

वाचा – चंद्रपूर ते मुंबई, रेल्वे सुरू

 

नव्या संसद भवनातील दरवाज्याला लावलेले लाकूड चंद्रपुरातील आहे, तिथून मला जाण्याचा प्रसंग येऊ नये अशी मला भीती वाटते अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली होती. Bjp candidate sudhir mungantiwar

 

वाचा – वाघाचा 58 वर्षीय इसमावर हल्ला, इसम ठार

ते लाकूड भाजपच्या जंगलातील नव्हते ते चंद्रपुरातील आहे, मुनगंटीवार यांची इच्छा नसताना त्यांच्या गळ्यात ही वरमाला टाकण्यात आली असून त्यांचा दिल्ली जाण्याचा मार्ग कठीण आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!