Botanical Garden Opening Chandrapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

Botanical Garden Opening Chandrapur चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील विसापूर येथे 11 मार्च सोमवारी बॉटनिकल गार्डन चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे, त्याकरिता प्रशासनाने सदर मार्गावरून अवजड वाहनाचा मार्ग बदलला आहे.

 

चंद्रपुरात अनेक वर्षांपासून निर्माण होणाऱ्या आधुनिक बॉटनिकल गार्डनचे काम पूर्णत्वास आल्याने 11 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे, त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. Botanical Garden Opening Chandrapur

 

चंद्रपूर ते बल्लारपूर या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक 11 मार्च रोजी पूर्णतः बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काढले आहे.

अवश्य वाचा – चंद्रपुरात येणार उष्णतेची लाट

 

मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी गौडा यांनी वाहन चालकाना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असेही यावेळी सूचित केले आहे.

11 मार्च ला मुख्यमंत्री शिंदे सह इतर मंत्र्यांची उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील, त्यांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील अवजड वाहतूक बंद राहतील, सदर आदेशाची अंमलबजावणी ही 11 मार्च ला दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत राहतील.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आपल्या अधिकारातील मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1) व मोटर वाहन अधिनियम 1988 मधील कलम 115 चा वापर करीत सार्वजनिक ठिकाणी रहदारी सुरळीत रहावी यासाठी वापर केला आहे.

 

अवजड वाहन चालकांचा हा असेल पर्यायी मार्ग

 

वरोरा भद्रावती व चंद्रपूर कडून राजुरा किंवा गडचांदूर कडे जाण्यासाठी पडोली-धानोरा फाटा भोयगाव मार्गाचा अवलंब करावा. गडचांदूर व राजुरा कडून वरोरा, भद्रावती व चंद्रपूर कडे येण्यासाठी भोयगाव-धानोरा फाटा -पडोली या मार्गाचा वापर करावा. गोंडपीपरी व कोठारी कडून चंद्रपूर किंवा मूल जाण्यासाठी येनबोडी-पोम्भूर्णा या मार्गाचा वापर करावा, चंद्रपूर व मुल कडून बल्लारपूर, गोंडपीपरी व राजुरा जाण्याकरिता पोम्भूर्णा मार्गाचा अवलंब करावा असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काढले आहे.

त्यानुसार बामणी फाटा बल्लारपूर ते बंगाली कॅम्प चौक चंद्रपूर पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश गौडा यांनी दिले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!