Chandrapur Lok Sabha Constituency लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यात निवडणुका होणार आहे, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे.
27 मार्च रोजी चंद्रपुरात विविध राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यामधून 15 उमेदवार वैद्य ठरले.
हे ही वाचा – चंद्रपुरात आगीचे तांडव
27 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात 36 उमेदवारांनी 48 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते, 28 मार्चला अर्जाच्या छानणीनंतर 36 पैकी 15 उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यात आले असून 21 अर्ज बाद करण्यात आले आहे. Chandrapur Lok Sabha Constituency
हे ही वाचा – वाहतुकीचा खोळंबा, चंद्रपुरात राजकीय त्सुनामी
उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये कांग्रेस प्रतिभा धानोरकर, भाजप सुधीर मुनगंटीवार, बहुजण समाज पक्ष राजेंद्र रामटेके, जनसेवा गोंडवाना पार्टी अवचित सयाम, जय विदर्भ पार्टी अशोक राठोड, गोंडवाना गणतंत्र पार्टी नामदेव शेडमाके, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पूर्णिमा घोनमोडे, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले, अखिल भारतीय मानवता पक्ष वनिता राऊत, सन्मान राजकीय पक्ष विकास लसंते, भीम सेना विद्यासागर कासरलावार, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सेवकदास बरके, अपक्ष दिवाकर हरिजी उराडे, अपक्ष मिलिंद दहिवले, अपक्ष नीलकंठ गावंडे यांचा समावेश आहे. Chandrapur Lok Sabha Constituency
वैद्य ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 30 मार्चपर्यंत मुदत आहे, त्यानंतर प्रचाराला सुरुवात होणार.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे, ज्यामध्ये चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी विधानसभेचा समावेश आहे, या निवडणुकीत एकूण 18 लाख 36 हजार 31 मतदार मतदानाचा हक्क 19 रोजी बजावतील.