Chandrapur Loksabha Bjp Hansraj Ahir : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी “भैया” तयार

Chandrapur Loksabha Bjp Hansraj Ahir
मी चंद्रपूर लोकसभा 1996 मध्ये पहिल्यांदा जिंकलो. 1991 च्या निवडणुकीमध्ये भाजपा तिसऱ्या क्रमांकावर होता त्यानंतर एकूण 4 वेळा जिंकलो,
माझ्या मूळ जातीची फक्त 150 परिवार असतील तरी पण पक्षाने मला वारंवार उमेदवारी दिली, 4 वेळा कार्यकर्त्यांनी व जनतेने विजयी केले. ही माझ्या पक्षाची व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जनतेची महानता आहे.

 

मी लोकसभा जिंकलो तेव्हा पक्ष जिंकला, पक्षाचे विचार जिंकले, लोकशाहीचा विजय ठरत होता, संविधानाचा सन्मान होत होता. निवडणूक ही विचारांची असते. पुढेही लोकशाहीला हेच अभिप्रेत आहे. मी चारित्र्य सांभाळले, जनतेच्या मताचा आदर केला. Chandrapur Loksabha Bjp Hansraj Ahir

ही निवडणूक सुद्धा पक्ष जिंकेल. चंद्रपूर भाजपचा गड आहे. दुर्देवाने मागची निवडणूक आम्ही जिंकलो नसलो तरी आमची एकता, एकाग्रता पक्ष बांधणीतून आम्ही विजयाकडे चाललो आहे.

मिशन महाविजय-2024 महाविजय संकल्प 400 पार, प्रधानमंत्री मोदी जी 3 री बार यात चंद्रपूर राहिलच. आम्ही लढू, आम्ही जिंकू.

यापूर्वी वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांना जाहीररीत्या प्रतिक्रिया दिली की मी लोकसभा निवडणुक लढण्यास तयार नाही, पण पक्षाने आदेश दिल्यास मला पर्याय नाही.

आता स्वतः मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, 4 वेळा खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्री पदी विराजमान झालेले हंसराज अहिर यांनी आज चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढणार अशी जाहीररीत्या प्रतिक्रिया दिली आहे.

मात्र चंद्रपुरातील दोन्ही नेत्यांना पक्ष आदेशाची वाट आहे, भैया की भाऊ हे काही दिवसात अधिकृत जाहीर होणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!