Chandrapur loksabha election 2024 : चंद्रपूर लोकसभेतील उमेदवारांना मिळाली ही “पॉवर”

Chandrapur loksabha election 2024 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील 2 तगड्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे, महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर व महायुतीचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

हे ही वाचा : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन

आमदार धानोरकर ह्या पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवीत आहे तर सुधीर मुनगंटीवार हे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे, मुनगंटीवार यांचा दोनदा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. Chandrapur loksabha election 2024

हे ही वाचा – कांग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला, म्हणत भाजप पक्षात प्रवेश

सध्या या अटीतटीच्या निवडणुकीत दोघांचे एकमेकांवर टीकास्त्र सुरू झाले आहे, मात्र या टीकेच्या वातावरणात दोन्ही उमेदवारांना विशेष पॉवर मिळाली आहे. Chandrapur loksabha election 2024

 

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना जय विदर्भ पार्टी व पॉवर फ्रंट कंत्राटी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला तर दुसरीकडे महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष व तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे यांचा भाजपात प्रवेश केला. Chandrapur loksabha election 2024

 

देवतळे यांच्या भाजप प्रवेशाने कांग्रेसचे काही कार्यकर्ते व तेली समाज भाजप कडे वळणार अशी चिन्हे आहे तर हुकूमशाही विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात पॉवर फ्रंट कंत्राटी कामगार संघटना व जय विदर्भ पार्टीच्या पाठिंब्याने धानोरकर यांना सुद्धा बळ मिळाले आहे. Chandrapur loksabha election 2024

 

सध्या समाजमाध्यमावर चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वाधिक विकास कुणी केला? कोण उमेदवार सर्वात जास्त शिक्षित आहे? जिंकणार कोण? असे ट्रेंड सुरू आहे, काहींमध्ये धानोरकर तर दुसरीकडे मुनगंटीवार या ट्रेडन मध्ये पुढे आहे. Chandrapur loksabha election 2024

 

कोरोना काळात कुणी जास्त काम केले? यावर सुद्धा दोन्ही उमेदवारांची जुंपली आहे, मात्र विजयी शिक्का हा 19 एप्रिल रोजी मतदार राजा नक्कीच मारणार.

 

जिल्ह्यातील प्रमुख मुद्दे काय? ज्यांचं निराकरण अजून झालेले नाही?

बेरोजगारी, चंद्रपुरात येणारा पूर, जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा, बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल, प्रदूषणाची वाढत असलेली समस्या, शहरात होणारी वाहतूक कोंडी, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, मानव-वन्यजीव संघर्ष, भ्रष्टाचार, महाकाली यात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंची होणारी दुरव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या अश्या विविध समस्येने चंद्रपूर जिल्हा ग्रासलेला आहे. या सर्व समस्येवर 5 वेळा मंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार व पहिल्यांदा आमदारकी भूषविलेल्या प्रतिभा धानोरकर यांनी काय केलं व पुढे काय करणार हे बघून मतदार नक्कीच निर्णय घेणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!