Chandrapur Loksabha Election महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 31 मार्चला शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटिका उज्वला नलगे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला.
हे अवश्य वाचा : चंद्रपूर लोकसभा उमेदवार म्हणतात आनंदाच्या शिधासोबत व्हिस्की व बिअर देणार, खासदार तर बनवा
देशविकासाच्या लाटेत सहभागी होण्यासाठी रविवारी शेकडो उत्तर भारतीय नेते व पदाधिका-यांनी ‘सोमवार से रविवार जनता की सेवा करेंगे सुधीर मुनगंटीवार’ असा नारा देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. Chandrapur Loksabha Election
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर भारतीय समाजाचे नेते दीपक सिंग यांचेसह शेकडो नेते व पदाधिकारी तसेच, उबाठा महिला प्रमुख उज्ज्वला नलगे यांचे भाजपात स्वागत केले. कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, महानगर अध्यक्ष राहूल पावडे यांच्यासह सुनिल सिंग, वंदना सिन्हा, रामपाल सिंग, अजय दुबे, विरेंद्र सिंग, मथुराप्रसाद पांडे, रुद्रनारायण तिवारी, शिवचंद द्विवेदी, डी. के. सिंग, मुन्ना ठाकूर, प्रकाश देवतळे यांच्यासह उत्तर भारतीय समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. Chandrapur Loksabha Election
हे ही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील 6 अट्टल गुन्हेगार तडीपार
उत्तर भारतीय समाजबांधवांना संबोधित करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भाजपा माझ्यासाठी राजकीय पक्ष नसून परिवार आहे. या परिवारात तसेच, देशाच्या विकासाच्या ‘जंग’ मध्ये उत्तर भारतीय नेत्यांचे जंगी स्वागत आहे. आपल्या मतदारसंघातील ज्या काष्ठाने संसद भवनाचे दरवाजे तयार झाले, ते दरवाजे सोमवार ते रविवार आपल्यासाठी खुले राहणार आहेत. आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी तिथे चोविस तास काम करील आणि मतदारसंघाची उंची वाढवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. Chandrapur Loksabha Election
चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात केवळ उत्तर भारतीयच नाही 16 राज्यातील लोक वास्तव्यास आहेत. भाजपाचा सैनिक या नात्याने जात-पात-रंग-राज्य यांचा विचार न करता सर्वांच्या विकासासाठी आतापर्यंत काम केले. त्यांचे प्रेम मतदानाच्या रुपात आतापर्यंत मिळाले असून यापुढेही मिळेल असा विश्वास ना.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Chandrapur Loksabha Election
दीपक सिंग यांच्या नेतृत्वात उत्तर भारतीय समाजात विकासाचा दीपक चेतवण्यासाठी उत्तर भारतीय आघाडी चंद्रपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.