Chandrapur murder number 15 : चंद्रपुरात हत्या क्रमांक 15, हे आहे हत्येचे कारण

Chandrapur murder number 15 चंद्रपूर जिल्ह्यात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेले हत्येचे सत्र थांबता थांबत नाही आहे, जानेवारी ते आतापर्यंत जिल्ह्यात हत्येच्या 15 घटना घडल्या आहे, सध्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसत आहे.

 

हत्येची 15 वि घटना शहरातील मध्यभागी असलेल्या चंद्रपूर मुख्य रेल्वे स्थानकावर घडली, 35 वर्षीय युवकाला 24 वर्षीय युवकाने चाकूने वार करीत हत्या केली. Chandrapur murder number 15

 

GRP (government railway police) पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या पुढील तपास सुरू आहे.

 

घटना घडली कशी?

12 मार्च ला मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी हा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेल्या बाकावर झोपला होता त्यावेळी मृतकाने आरोपीचा दुपट्टा व त्याच्या खिशातील पर्स काढला, मात्र हा प्रकार करीत असताना आरोपीला जाग आली.

 

वाचा – पप्पू देशमुखांच्या आंदोलनाने प्रशासनाची उडाली झोप

माझ्या खिशातील सामान तू बाहेर का काढले म्हणून दोघांमध्ये वाद सुरू झाला, हा वाद सुरू असताना काही नागरिकांनी दोघांना बघितले.
मृतकाने आरोपीला मला पैश्याची गरज आहे म्हणून पर्स काढला असे सांगितले मात्र वाद हा वाढत गेला, तितक्यात मृतकाने आरोपीला आई वरून शिवीगाळ केली असता आरोपीने जवळील चाकू काढत त्या 35 वर्षीय युवकाच्या पोटात खुपसला. Chandrapur murder number 15

 

त्याच्या पोटातून रक्त वाहू लागल्याने आरोपीने तिथून पळ काढला, मृतक हा रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूम मध्ये गेला, चाकू आत गेल्याने त्याचा रक्तस्त्राव सुरू होता, काही वेळाने त्याठिकाणी रक्ताचा सडा पडला असता नागरिकांनी याबाबत रेल्वे पोलिसांना कळविले.

वाचा – तंबाखू तस्कर वसीम चा साठा, स्थानिक गुन्हे शाखेची धाड

पहाटे 4 वाजता पोलिसांनी जखमी युवकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रेल्वे पोलिसांनी मृतक युवकाबाबत माहिती काढली मात्र त्याबाबत काही कळू शकले नाही, तो वेटिंग रूम मध्ये कसा आला याबाबत स्थानकावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. Chandrapur murder number 15

 

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मधील सीसीटीव्ही तपासला असता त्यांना घडलेली घटना लक्षात आली.

याबाबत GRP यांना माहिती दिली असता ते घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तपास सुरू केला असता मृतकाची ओळख होऊ शकली नाही, सीसीटीव्ही च्या आधारे GRP ने आरोपीला अटक केली.

 

24 वर्षीय साहिल उर्फ मठया राजू आंबेकर, राहणार विठ्ठल मंदिर वॉर्ड असे आरोपीचे नाव, आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली, त्याला कारण विचारले आता मृतकाने पैसे चोरण्याचा प्रयत्न केला होता, त्या वादात मला त्याने आई वरून शिवीगाळ केली म्हणून हा प्रकार घडला.

वाचा – चंद्रपुरात नगरसेविकेचा पती करीत होता सुगंधित तंबाखूची विक्री

आरोपी साहिल हा अट्टल गुन्हेगार आहे, त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी व मारहाणीचे गुन्हे दाखल आहे, काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला अशी माहिती आहे, तो स्वतःजवळ नेहमी चाकू बाळगत होता.

 

सदरची कारवाई लोहमार्ग नागपूर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली GRP प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हर्षल चापले, पोलीस उपनिरीक्षक नारनवरे, पोलीस कर्मचारी खडतकर, संदेश लोणारे, पंकज भांगे, राजेंद्र फटींग, महिला पोलीस कीर्ती मेश्राम आदींनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!