Cultural Festival on International Women’s Day : बाबूपेठ येथे भव्य कार्यक्रम

Cultural Festival on International Women’s Day जागतिक महिला दिनाचे औचित्याने राजराजेश्वरी, गायत्री,सखी, रणरागिणी,श्री संताजी, परिवार, जिजाऊ,माऊली,सावित्रीबाई फुले,सहेली महिला बचत गट बाबुपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक बजरंग क्रीडा संकुल बाबूपेठ येथे महिलांचा सांस्कृतिक महोत्सव आणि आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाचे उदघाटन चंद्रपूर चे प्रसिद्ध उद्योगपती चंद्रकांतजी वासाडे यांचे हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष ,चंद्रपूर च्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ इंदूताई अग्रवाल मॅडम तर प्रमुख अतिथी प्रसिद्ध कलावंत अनिरुद्ध वनकर,इन्स्पियर चे संचालक प्रा,विजय बदखल,संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी,राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संतोष कुचनकर,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनिता बोबडे,जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष अर्चना चौधरी,जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष सारिका कुचनकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश वैरागडे, कार्यक्रमाच्या संयोजक तथा महिला बचत गट संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे उपस्थितीत घेण्यात आला. Cultural Festival on International Women’s Day

 

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तथा द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली,सर्व मान्यवरांचे बचतगटा तर्फे शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

प्रस्ताविकेतून चंदाताई वैरागडे यांनी 10 महिलापासून सुरू केलेला एक बचत गट अनेक झाले आणि 500 च्या वर महिला जुळ्ल्या आहेत हे केवळ महिलांनि दाखविलेला विश्वास आणि केलेल्या प्रामाणिक कार्याची पावती आहेत,महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा,रक्तदान शिबिर ,आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, हळदीकुंकू इत्यादी कार्यक्रम घेण्यात येतात आणि प्रत्येक कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. Cultural Festival on International Women’s Day

 

आज सुद्धा आनंद मेळाव्यात इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल आणि सांस्कृतिक कार्यक्रमात एका पेक्षा एक सरस असे सामूहिक व एकल नृत्य स्पर्धेत बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला आहे,असेच सहकार्य सदैव द्याल असे प्रस्ताविकेतून सांगितले.

 

उदघाटक चंद्रकांतजी वासाडे यांनी चंदाताईनी बचत गटाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचं संघटन करून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाल्याचे आजच्या उपस्थितीवरून आणि नियोजनबद्ध कार्यक्रमावरून दिसून येत आहे हीच चंदाताई च्या कार्याची पावती आहे, याप्रसंगी प्रसिद्ध कलावंत अनिरुद्धजी वनकर यांनी प्रोत्साहन गीत म्हटले.

 

प्रा विजय बदखल,प्राचार्य नरेंद्र बोबडे,संतोष कुचनकर यांनीही मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे अध्यक्षा डाँ इंदूताई अग्रवाल यांनी महिलांनी कुठल्याही कठीन प्रसंगाला घाबरून न जाता संयमाने सामना केला पाहिजे आणि आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिक भांड्यात कुठलेही खाण्याच्या वस्तू ठेऊ नये हे सांगितले. आणि महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

 

यानंतर सुरू झालेल्या नृत्य स्पर्धेत महिलांनी एकापेक्षा सरस असे नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली, यामध्ये प्रथम क्रमांक रणरागिणी ग्रुप पटकाविला, विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

 

या डान्स चे पर्यवेक्षक रिंकू देठे यांनी केले. आनंद मेळाव्यात स्वादिष्ट वस्तूचे बहुसंख्य स्टॉल लावले होते, त्याचा आस्वाद हजारो च्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी घेतला,कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थित होती, कार्यक्रमाचे संचालन प्रियंका खनके, सरोज चांदेकर यांनी आभार सुरज बिट्टे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बचत गटातील सर्व महिलांनी मोलाचे सहकार्य केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!