Dhariwal infrastructure chandrapur : सुर्या अडबाले यांचे आंदोलनात्मक आव्हान

Dhariwal infrastructure chandrapur चंद्रपूर तालुक्यातील सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या अत्यंत उपयुक्त असलेल्या रस्ता हा धारीवाल कंपनीच्या पाणी व ऐश टॅंक मुळे बंद करण्यात आला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे उपयुक्त साधन सामुग्री नेण्याकरिता शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे.

 

 

या समस्येचा मागील 10 वर्षापासून शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून ऐश टॅंक जागोजागी लिक असल्यामुळे छोटे छोटे गड्डे तयार झाले असून त्या दूषित पाण्यामुळे गुरेढोर बिमार होऊन मरण पावत आहेत तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांचा अत्यंत उपयुक्त असलेला रस्ता व छोटा पुल सुद्धा तयार करून द्यावे अशी सोनेगावातील शेतकऱ्यांची मागणी आहे. Dhariwal infrastructure chandrapur

 

गावातील असलेला नाला हा ऐशच्या गळतीमुळे बुजल्या गेला असून नाल्याचे खोलीकरण सुद्धा करून द्यावे व गावातील युवकांना कंपनीने रोजगार कोणालाही दिला नसून लवकरात लवकर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटणेच्या वतीने 16 मार्च ला दुपारी करण्यात आली. Dhariwal infrastructure chandrapur

 

मागणी पूर्ण न झाल्यास गावातील शेतकऱ्यांचा व बेरोजगार युवकांचा जन आक्रोश मोर्चा घेऊन धारिवाल कंपनी वर नेत त्यांना याबाबत जाब विचारण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले व डॉ. स्वप्नील बांदूरकर यांनी दिला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!