Chandrapur Lok Sabha Congress Candidate : चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार जवळपास निश्चित

Chandrapur Lok Sabha Congress Candidate आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या आणि उमेदवारी साठी इच्छुकांची गर्दी उसळू लागली.

भाजप व कांग्रेस पक्षात उमेदवारीसाठी सध्या जिंकू किंवा मरु असे वातावरण तयार झाले आहे, भाजप पक्षात हंसराज अहिर किंवा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

खासदार धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी पक्ष श्रेष्ठीने आमदार प्रतिभा बाळू धानोरकर यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले होते, जर कुटुंबातील राजकीय पदावर असलेल्या नेत्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला त्या जागेचे तिकीट मिळते, अशी परंपरा कांग्रेस पक्षात आहे. Chandrapur Lok Sabha Congress Candidate

त्याअनुषंगाने आमदार धानोरकर यांनी तयारी सुद्धा केली मात्र अचानक विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी कांग्रेस पक्षाला चंद्रपूर लोकसभेचे तिकीट मागितले.

तिकिटांची मागणी केल्यावर शिवानी वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात तसे वातावरण सुद्धा तयार करायला सुरुवात केली, मात्र मुंबई येथे झालेल्या पक्ष श्रेष्ठीच्या बैठकीत आमदार धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले.

अवश्य वाचा – चंद्रपुरातील VVIP कोण?

मात्र असे असताना सुद्धा शिवानी वडेट्टीवार यांनी आपण लोकसभा लढविण्यास इच्छुक आहे असे विधान कायम ठेवले, ज्यामुळे कांग्रेस पक्षात पुन्हा धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष पुढे आला आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे, उद्या जर कांग्रेस पक्षाने लोकसभेवर ओबीसी उमेदवार उभा केल्यास त्याला पाडण्यासाठी पक्षातील व इतर 10 ओबीसी उमेदवार निवडणूक लढायला तयार होतील, याचा फायदा भाजपला नेहमीप्रमाणे मिळेल हे मात्र खरे.

 

9 मार्च रोजी कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे व आमदार प्रतिभा धानोरकर यांना पक्ष श्रेष्ठीने मुंबईला बोलाविले आहे, आमदार धानोरकर यांची कांग्रेस पक्षाने उमेदवारी पूर्णतः फायनल केली असल्याची माहिती सुद्धा पुढे आली आहे. आमदार धानोरकर यांचं नाव कांग्रेसच्या पहिल्या यादीत येण्याची शक्यता आहे, विधानसभा निवडणुकीत सुद्धा आमदार धानोरकर यांचं नाव पहिल्या यादीत समाविष्ट होतं.

 

तत्कालीन खासदार बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं नसत तर आज जे कांग्रेस पक्षात राजकीय वातावरण तापलेले आहे ते पूर्णतः थंड अवस्थेत दिसलं असतं, काहीही असो येणारी लोकसभा निवडणुक देशात अटीतटीची असणार पण सर्वात जास्त महत्वाची लोकसभा जागा ही चंद्रपूरची असणार हे विशेष, कारण 4 वेळा खासदार व केंद्रात मंत्री असलेले हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ बाळू धानोरकर यांनी चाखायला लावली होती, राज्यात एकमेव कांग्रेस खासदार हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!