Fierce fire in Chandrapur : A to Z बाजाराला भीषण आग

Fierce fire in Chandrapur चंद्रपूर शहरातील गृहउपयोगी वस्तूंच्या दुकानात आज 15 मार्चला सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

 

आगीचा धूर दिसतात नागरिकांनी त्या दिशेने धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले, आग हळूहळू रौद्र रूप धारण करीत असल्याने अजूनही आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. Fierce fire in Chandrapur

 

शहरातील तुकुम परिसरात गजबजलेल्या ठिकाणी असलेले A TO Z बाजारात सकाळच्या सुमारास अचानक आग लागली, हळूहळू आगीने रौद्र रूप धारण केले, तुकुम भागात आगीचा धूर पसरल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन बघितले, सुजाण नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली, अग्निशमन विभागाची गाडी त्याठिकाणी पोहचली मात्र अजूनही आग आटोक्यात आली नाही. Fierce fire in Chandrapur

वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील या सावकारांचे परवाने रद्द

A TO Z बाजाराच्या बाजूला हॉटेल आहे, जर आग आटोक्यात आली नाही तर भयावह दुर्घटना शहरात टाळता येणार नाही.

 

सदर आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली असा अंदाज आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!