Fire at Hindustan Motors चंद्रपूर शहरातील रामनगर चौकात हिंदुस्थान मोटर्स गॅरेज ला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली, या आगीत गॅरेज जळून खाक झाले.
हे ही वाचा – चंद्रपुरात उसळला जनसागर
28 मार्च ला सकाळी 7 वाजता गॅरेज जवळ असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला कुणीतरी जाळले ती आग हळूहळू वाढत हिंदुस्थान मोटर्स पर्यंत पोहचली, आणि त्या आगीत संपूर्ण गॅरेज जळून खाक झाले. Fire at Hindustan Motors
हे ही वाचा – चंद्रपूर लोकसभेसाठी 36 उमेदवारांचे अर्ज दाखल
सदर गॅरेज हे शब्बीर अहमद यांचे असून त्यांनी सांगितले की सकाळी मला काही नागरिकांचा कॉल आला होता त्यांनी सांगितले की तुमच्या दुकानात आग लागली आहे, जोपर्यंत मी पोहचलो तो पर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. दुकानात बॅटरी, व दुचाकीने नवीन सामान दोन दिवसांपूर्वी आणले होते ते सर्व जळाले, या आगीत 7 ते 8 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. Fire at Hindustan Motors