Food poisoning to police constables in Chandrapur चंद्रपुरात प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या 41 पोलिस शिपायांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना 10 मार्च ला उघडकीस आली. यामध्ये तब्बल 9 पोलिसांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे.
वाचा – निर्भय बनो सभा चंद्रपुरात 14 मार्च ला
रविवारी पोलीस फुटबॉल मैदानावरील पोलीस कॅन्टीन मध्ये 200 पोलिसांनी जेवण केले होते, त्यामध्ये 41 पोलिस शिपाई यांना जेवणानंतर काही वेळाने उलट्या झाल्या, तात्काळ पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. Food poisoning to police constables in Chandrapur
रुग्णालयात डॉक्टरांनी 32 पोलिसांवर प्राथमिक उपचार करून सुट्टी दिली तर 9 पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अजूनही बाधित पोलीस रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती आहे, त्यामुळे बाधित पोलिसांची संख्या वाढू शकते.
वाचा – आमदार किशोर जोरगेवार यांचा मतदारसंघात विक्रम
रविवारचा दिवस असल्याने आज चिकन ची भाजी पोलीस कॅन्टीन मध्ये होती, पोलिसांनी जेवण केल्यावर लगेच त्यांना उलट्या सुरू झाल्या.
याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यांनी पोलीस कॅन्टीन परिसर हे स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहे अशी माहिती मिळाली आहे.
डॉक्टर या प्रकरणावर म्हणतात की उन्हामुळे हा प्रकार घडला, मात्र रविवारी चंद्रपुरात ढगाळ वातावरण होते, या घटनेमुळे पोलीस प्रशासन सारवासारव करताना दिसून येत आहे.