Goa Fashion Week चंद्रपूर : अलीकडेच गोवा येथील सनसिटी रिसॉर्ट येथे मिस फेस ऑफ नेशन गोवा फॅशन विक ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चंद्रपूर येथील खुशबू नळे हिने प्रथम रनर अपचा मुकुट पटकावला आहे. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील ६० स्पर्धक सहभागी झाले होते. तिने सर्वांना मागे टाकत रनर अपचा मुकुट पटकावत राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्यस्पर्धेत चंद्रपूरचे नावलौकीक केले आहे.
खुशबू नळे ही सध्या गोंदिया येथे होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत असताना फॅशनचीही आवड तिला बालपणापासून होती. त्यामुळे तिने नागपूर येथे वन डायरेक्शन मॉडेलिंग अकादमीमध्ये फॅशन कोरिओग्राफर इमरान शेख पेजंट कोच पायल शाहू यांच्या मार्गदर्शनात फॅशनचे धडे घेतल्याचे तिने चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. Goa Fashion Week
विशेष म्हणजे डॉक्टरकीचे शिक्षण घेत असताना दर रविवारी गोंदियाहून नागपूर येथे प्रशिक्षणासाठी जात असल्याचे तिने सांगितले. वडील बंडू नळे, आई वेणू नळे यांनीही या स्पर्धेसाठी नेहमी प्रोत्साहन दिल्याचे तिने सांगितले. Goa Fashion Week
पुढे आणखी मोठ्या फॅशन स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवायचे असल्याचे तिने सांगितले. यावेळी तिच्यासोबत तिची आई वेणू नळे यांचीी उपस्थित होती