Illegal minor mineral mining कोरपना – गौण खनिजाची अवैध रित्या उत्खनन करून मालामाल होण्याची जणू स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे. रॉयल्टी कमीची आणि उत्खनन जास्तीचे असा फंडा वापरून शासनाचा सर्रास महसुल बुडवून व्यवसायीक मालामाल होत आहेत.
शुक्रवारी (8 मार्च) रात्री साडेकराच्या सुमारास जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील देवघाटावर नाल्यावर अवैद्य मुरुमाची चोरी होत असताना पोलिस व महसल विभागाने धाड टाकली. या संयुक्त कारवाईत 12 हायवा ट्रक पकडण्यात आले. त्यापैकी गौण खनिजाने भरलेले पाच हायवा ट्रक वरच पोलिस विभागाने कारवाई केली आहे. पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. Illegal minor mineral mining
वर्षभरापासून राजुरा – गोविंदपुर (353 बी) या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट जीआरआयएल (gril) या कंपनीला मिळाले आहे. रस्ता तयार करण्याकरीता कंपनीला गौण खनिजाची म्हणजे मुरुम माती व रेतीची आवश्यकता आहे.
वाचा – चंद्रपुरात 24 लाख 75 हजारांची रोकड जप्त
गौण खनिजाला कोरपना तालुक्यातील अंमलनाला, देवघाटनाला, पकडीगुड्डम, आदी ठिकाणावरून काढण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र कंपनीने परवानगी पेक्षा अतिरिक्त गौण खनिजाचे उत्खनन करून बारमाही वाहणारे जिवंत नाले पोखरून काढले आहेत. Illegal minor mineral mining
संबंधीत विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार वाढल्याने गौण खनिज तस्करांचे फावत आहे. चोरी प्रकरणात अनेक तक्रारी झाल्या, परंतु प्रशासनाने छोट्या मोठ्या कारवाईचा फार्स दाखविला. दबावापोटी कारवाईला ठेंगा दाखविल्याने गौण खनिजाची तस्करी सर्रास सुरूच आहे.
नव्यानेच रूजू झालेले पोलीस अधिक्षक ममुका सुदर्शन यांना तक्रारी प्राप्त होताच त्यांनी पोलिस व महसूल विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिस अधिक्षकाच्या निर्देशानुसार शुक्रवारी पोलिस व महसूल विभागाने कोरपना तालुक्यातील देवघाट नाल्यावर मुरूमाची तस्करी होत असताना धाड टाकली. या कारवाईत 12 हायवा ट्रक घटणास्थळी पकडण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाकरीता जीआरआयएल कंपनीला नाल्यावरून मुरुम माती उत्खनना परवानगी मार्च २४ पर्यंत मिळालेली आहे. या कालावधीत कंपनीला ५३ हजार ब्रासचे उत्खनन करायचे होते. परंतु वाजवीपेक्षाही जास्तीचे उत्खनन करून नालाच पोखरून टाकला आहे. 53 हजाराच्या ऐवजी लाखों ब्रास अवैद्यरित्या दिवस रात्र उत्खनन करण्यात आले आहे.
मंजुरी नुसार 30 सप्टेबर पर्यंतच 52 हजार 500 ब्रास उत्खनन झाले आहे. त्यानंतरही मागील चार महिण्यापासून 24 तास गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाच्या महसुलाला चुना लावण्यात आला आहे. रात्री गौण खनिजाची वाहतूक करता येत नाही परंतू अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा वाहतुकीचा गोरखधंदा दिवस रात्र सुरूच आहे.
पोलिस अधिक्षकांच्या निर्देशानंतर शुक्रवारी रात्री अकराचे सुमारास तहसिलदार व्हटकर व ठाणेदार एकाडे यांनी कोरपणा तालुक्यातील देवघाट नाल्यावर ताफ्यासह धाड टाकली. घटनास्थळावर पोकलेन व हायड्रा मशीन तसेच वाहतूक होत असलेले 12 हायवा आढळून आले. त्यापैकी गौण खनिजाने भरलेले 5 हायवावरच कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित खाली हायवा व मशीन सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र खाली हायवा आणि उत्खनन करणारे मशीन का सोडून देण्यात आले असा प्रश्न विचारला जात आहे.
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेले कोरपना, या तालुक्यात अवैध धंद्यांचा मोठा जोर आहे, विशेष म्हणजे कोरपना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकाडे यांच्यावर अनेकांनी गंभीर आरोप केले, विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार सुद्धा करण्यात आली आहे, इतके दिवस ग्रील कंपनीने अवैध गौण खनिजाचे उत्खनन केले ते कुणाच्या आशीर्वादाने? स्थानिक प्रशासनाचा सहभाग असल्याशिवाय बाहेरच्या कंपनीची हिंमत वाढली कशी? प्रशासनाला चुना लावणारे प्रशासनातील अधिकारीच आहे.
पोलीस प्रशासनाला 5 हायवा ट्रक वर कारवाई केली तर उर्वरित हायवा ट्रक का सोडले ? अशी विचारणा केल्यावर त्याबाबत उत्तर महसूल प्रशासन देणार असे सांगण्यात आले हे विशेष.. एकंदरीत अनेक दिवसांनी जागे झालेल्या प्रशासनाने कारवाई केल्यावर प्रशासनाचेच धाबे दणाणले हे वाक्य प्रयोग केल्यास फारकत नाही.