In the forest of man-eating tigers : बल्लारपूर येथील जंगलात रात्री त्या दोघांना अटक

In the forest of man-eating tigers बल्लारपूर :- वन विभागाने नागरिकांना जंगलात जाऊ नये असे आव्हान केल्या नंतर ही नागरिक जंगलात जाऊन आपला जीव गमावतात. जंगलात नरभक्षक वाघ असल्याने वाघाने आत्ता पर्यंत तीन चार इसमावर हल्ला करून शिकार केली आहे.

वाचा – चंद्रपुरात दारूसाठा नष्ट, महिलेवर गुन्हा दाखल

सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाने वन विभागाला निवेदन देऊन नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी विनंती केली आहे. त्यानुसार वन विभागाने नरभक्षक वाघाला पकडन्याकरिता बंदोबस्त करीत लाईव्ह कॅमेरा लावलेले आहे. In the forest of man-eating tigers

 

जंगलात राखीव वन खंड क्र,493मधील वनात दोन इसम1)चंदन तिलोकांनी गांधी वॉर्ड,2)सारंग राहुलगडे, साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर, यांनी अपप्रवेश करून जंगलात फिरत असतांना वनातील लाईव्ह कॅमेरे मध्ये दिसून आले, वनविभाचे चे अधिकारी यांनी दोघांनाही ताब्यात घेवून झडती केली असता त्यांचा जवळ ज्वलनशील साहित्य आढळून आले त्या मुळे वनात अपप्रवेश करून वनात आग लावण्याचा दृष्टीने ज्वलनशील साहित्य नेल्या प्रकरणी व आदमखोर वाघ जेरबंद मोहिमे दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या बाबत त्यांचे विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 26(1)ब, ड, नुसार प्राथमिक वन गुन्हा क्र,08962/224042दि,17-03-24अन्वये वन गुन्हा नोंदवून त्याचे कडील साहित्य (मोटारसायकल व मोबाईल )जप्त करण्यात आले. In the forest of man-eating tigers

 

वाचा – विनायक बांगडे लढणार चंद्रपूर लोकसभा निवडणूक?

वन विभागा वेळोवेळी आव्हान करीत आहे की जंगलात नरभक्षक वाघ असल्याने कोणीही कोणत्याही कामा करिता जंगलात जाऊ नये,जंगलात कोणीही व्यक्ती फिरत असतांना दिसला की वन विभाग कडक कारवाई करणार आहे.

वाचा – चंद्रपुरातील खुशबू ने पटकाविला सौंदर्याचा मुकुट

सदर प्रकरणात पुढील तपास मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर चे उपवनरक्षक श्रीमती श्वेता बोड्डू व सहाय्यक वनरक्षक आदेश कुमार शेडगे यांचा मार्गदर्शनातं वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे हे करीत आहे. In the forest of man-eating tigers

 

सदर कारवाई दरम्यान क्षेत्र सहाय्यक पठाण, रामटेके, पुरी, वन रक्षक सुधीर बोकडे, तानाजी कामले, परमेश्वर आणकडे, रणजित दुर्योधन, कु, वैशाली जेणेकर, माया पवार, सुनील नन्नावरे, मनोहर घाईत, धर्मेंद्र मेश्राम, देशमुख, व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!