India Alliance Press Conference : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मुनगंटीवार यांच्या विरोधात असंतोष – आमदार सुभाष धोटे

India alliance press conference भाजपने चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार घोषित केल्यावर इंडिया आघाडीत सुद्धा उमेदवार लवकर घोषित व्हावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे.

 

 

खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे त्या जागेवर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचा हक्क असल्याचे कांग्रेस पक्षातून नेहमी बोलल्या गेले, मात्र अचानक विजय वडेट्टीवार यांच्या कन्येचे नाव लोकसभा उमेदवारीसाठी पुढे आल्याने उमेदवारीसाठी कांग्रेस पक्षात चुरस वाढली आहे. India alliance press conference

वाचा – आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संघर्षाला यश

मात्र चंद्रपुरातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी बैठक घेत चंद्रपूर लोकसभेसाठी लोकसभा क्षेत्रातील स्थानिक असावा अशी एकमुखाने मागणी केली.

 

15 मार्च ला इंडिया आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यामध्ये कांग्रेसचे आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी, महिला कांग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांची उपस्थिती होती. India alliance press conference

वाचा – निर्भय बनो सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी रेड सिग्नल

 

यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी भाजप लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या टीका करीत, मुनगंटीवार यांना चंद्रपूर शहराच्या बाहेर कोण ओळखत, ग्रामीण भागातील नागरिक मुनगंटीवार यांना ओळखत नाही, सुधीर मुनगंटीवार यांची जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. India alliance press conference

वाचा – चंद्रपुरातील या सावकारांचे परवाने झाले रद्द

तिकीट मिळण्याच्या आधी ते म्हणायचे संसद भवणातील दरवाज्याला लागलेले लाकूड हे चंद्रपुरातील आहे, त्या दरवाज्यातून मी जाणार अशी भीती माझ्या मनात आहे, मात्र चंद्रपूरची जनता तुम्हाला त्या दारातून जाऊ देणार नाही याची काळजी आम्ही घेणार असे वक्तव्य आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!