Jai vidarbha party महाविकास आघाडीच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना मतदार संघातून मोठा पाठिंबा मिळत आहे. विविध सामाजिक संघटना प्रतिभाताई धानोरकर यांच्या समर्थनार्थ उभ्या झाल्या आहेत. आता जय विदर्भ पार्टीने एकमताने प्रतिभाताई धानोरकर यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा – चंद्रपुरात अवैध धंद्यावर लगाम तर गुन्हेगारी झाली बे लगाम
आपण प्रतिभाताई यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र जय विदर्भ पार्टीने पाठविले आहे. हुकूमशाही विरोधातील लढ्यात आपण खंबीरपणे ताईंच्या सोबत असल्याचे पार्टीने म्हटले आहे. Jai vidarbha party
चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना मतदार संघातून मोठा पाठिंबा मिळत आहे. चंद्रपूर शहरात निघालेल्या रॅली आणि सभेला अलोट गर्दी उसळली होती. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता प्रतिभाताई यांना समर्थन देण्यासाठी मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून जनता आली होती. हुकूमशाही विरोधातील लोकशाहीच्या या लढ्यात आता जय विदर्भ पार्टीने एकमताने प्रतिभाताई धानोरकर यांना समर्थन दिले आहे. Jai vidarbha party
ताईंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पार्टीचे संस्थापक व अध्यक्ष रमेशभाऊ बिसेन यांनी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया व यवतमाळ ह्या चारही जिल्हयांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व चंद्रपूर जिल्हयाचे कार्यकर्ते यांनी गजानन सभागृह चंद्रपूर येथे मिटींग घेतली. या मिटींगमध्ये चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचे यावर चर्चा झाली. प्रतिभाताई धानोरकर यांना पाठिंबा देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. Jai vidarbha party
पार्टीने केवळ चंद्रपूर जिल्हयात प्रतिभाताई धानोरकर यांनाच पाठींबा द्यायचे ठरविले आहे. प्रतिभाताईंना लहानमोठ्या कार्यकर्त्यांची जाणीव आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही मतभेद दिसलेला नाही. जय विदर्भ पार्टीचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील, याची हमी पार्टीने दिली आहे. चार जिल्हयातून जय विदर्भ पार्टीची सभासद संख्या व विदर्भ प्रेमीची संख्या मोठी आहे. जय विदर्भ पार्टीने दिलेल्या पाठिंब्यामुळे प्रतिभाताई धानोरकर यांची ताकद वाढली आहे. Jai vidarbha party
जय विदर्भ पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सौ. विजयाताई बच्छाव, गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजीवभाऊ विश्वास, यवतमाळ (वणी) जिल्हाध्यक्ष श्री. रामभाऊ राठोड, गोंदीया जिल्हाध्यक्ष रामप्रसाद उईके, चंद्रपूर तालुकाध्यक्ष गुलशन पठाडे,भद्रावती तालुका प्रमुख विनय कोंडावार, वरोरा तालुकाध्यक्ष भारतीताई कामडी, बल्लारपूर, मुल तालुकाध्यक्ष शिलालाई टाकडे, कोरपना तालुकाध्यक्ष सुजाताताई रंगारी, राजुरा तालुकाध्यक्ष स्मिताताई रायपुरे, गोरेगाव तालुकाध्यक्ष बंडूभाऊ येडे, तिरोडा तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पारधी मिटिंग मध्ये उपस्थित होते.