Leopard attack on 7-year-old girl : चंद्रपुरात 7 वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

Leopard attack on 7-year-old girl चंद्रपूर/बल्लारपूर – 13 मार्च ला सकाळी 7 वर्षीय मुलगी घरासमोर खेळत असताना तिच्यावर बिबट्याने झडप घातली, मुलीचा रडण्याचा आवाज ऐकताच काकाने त्या दिशेने धाव घेतली असता बिबट 7 वर्षीय मुलीला पकडून होता, अखेर काकाने पुतनीला वाचवीत तिला रुग्णालयात नेले, मात्र त्या मुलीच्या डोक्यावर गंभीर इजा झाली.

 

बल्लारपूर शहरातील पंडित दीनदयाळ वार्डातील बांबू डेपो परिसरात ही घटना 13 मार्च ला सकाळी 8 वाजता घडली.

 

वाचा – चंद्रपुरात 500 खोके एकदम ओके चे नारे

7 वर्षीय मुलगी आफ्रिना इकबाल शेख ही घरापुढे खेळत होती, अचानक त्याठिकाणी बिबट्याने आफ्रिना वर हल्ला केला, आफ्रिना च्या रडण्याचा आवाज ऐकून काकाने बिबट्या पुढे उडी घेतली, त्या आवाजाने बिबट पळून गेला. Leopard attack on 7-year-old girl

 

जखमी अवस्थेत असलेल्या आफ्रिना ला काकाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, आफ्रिना च्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.

 

याबाबत नागरिकांनी सांगितले की आम्ही बऱ्याचं वर्षांपासून परिसरात फेंसिंग लावण्याची मागणी वनविभागाकडे करीत आहो मात्र आमच्या मागणीवर दुर्लक्ष होत आहे, आतापर्यंत या परिसरात अश्या 3 घटना घडल्या असून यामध्ये एकाने आपला जीव गमावला, मात्र त्यानंतर सुद्धा वनविभाग आमच्या मागणीवर दुर्लक्ष करीत आहे. Leopard attack on 7-year-old girl

 

बल्लारपूर वनपरिक्षेत्र चे वनाधिकारी भोये यांनी सांगितले की आम्ही बिबट्याला पकडण्याचे मागील काही दिवसांपासून प्रयत्न करीत आहो, परिसरात पिंजरे सुद्धा लावण्यात आले आहे, त्या परिसरात 1 किलोमीटर अंतर एवढी फेंसिंग केल्या गेली तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा प्रश्न सुटेल, याबाबत जिल्हा वार्षिक विकास निधी कडे प्रस्ताव पाठविला मात्र अद्यापही निधी मंजूर झाला नाही, याबाबत सध्या पाठपुरावा सुरू आहे, निधी मंजूर झाल्यास तात्काळ फेंसिंगचे काम पूर्णत्वास येईल. Leopard attack on 7-year-old girl

 

वाचा – मुख्यमंत्री शिंदे चंद्रपुरातील अम्मा च्या भेटीला

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून महोत्सवाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू आहे, पालकमंत्री मुनगंटीवार हे राज्याचे वनमंत्री असून सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातील नागरिक वनप्राण्यापासून असुरक्षित आहे.

 

एकीकडे कोट्यवधी रुपयांची उधळण तर दुसरीकडे निधी मंजूर होत नसल्याने फेंसिंग अभावी वन्यप्राणी नागरिकांवर हल्ले करीत आहे.

 

वनमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात जर अशी परिस्थिती आहे तर जिल्ह्यात काय परिस्थिती असणार? एकंदरीत वनमंत्री यांच्या जिल्ह्यातील वनखातं स्वतः नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत असंवेदनशील असल्याचे दिसत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!