Mahavikas Aghadi Chandrapur जातीच्या भरवश्यावर, अश्रू ढाळून मते मिळत नाही, जर तुम्ही सहानुभूती बघत मतदान केले तर पुढील 5 वर्षे आपण रडत बसणार असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. मी त्यांना सांगू इच्छिते अश्रूना पुढे करून मी मते मागणार नाही. मी रडणारी नाही, लढणारी वाघीण आहे. बाळू भाऊंच्या जाण्याने चंद्रपूर लोकसभा मतदार संघ पोरका झाला होता.
हे ही वाचा – चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची पेड न्यूज वर नजर
माझ्यावर, माझ्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दुःख बाजूला सारून मतदार संघ मी पिंजून काढला. अश्यात एखाद्यावेळी डोळे दाटून आले तर त्याचे ही तुम्ही भांडवल करता. तुम्ही केलेल्या वक्तव्यातून तुमची असंवेदनशीलता दिसली. एका विधवेच्या अश्रूचा तुम्ही अनादर केला. इथे बसलेल्या माझ्या माया, बहीणी तुम्हाला माफ करणार नाहीत, अशी गर्जना महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. Mahavikas Aghadi Chandrapur
हे ही वाचा – चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन
आज चंद्रपुरात झालेल्या निर्धार सभेत त्या बोलत होत्या. पुढे प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्यात, अनिच्छेने एखाद्या नवरदेवाला लग्नाच्या मंडपात बसल्यावर ते लग्न टिकत नाही आणि संसार मोडतो, अशा नवरदेवासारखी केविलवाणी परिस्थिती सुधीर मुनगंटीवार यांची झाली आहे. ही लढाई हुकूमशाही विरोधात लोकशाहीची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलू पाहणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. Mahavikas Aghadi Chandrapur
निर्धार सभेपूर्वी इंडिया आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले, चंद्रपुरात पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येत एका उमेदवाराने भव्य रॅली काढली, सदर शक्तिप्रदर्शन रॅली ही दीड किलोमीटर इतकी मोठी होती, रॅली नंतर निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेत इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेत आज शहरात कार्यकर्त्यांची त्सुनामी बघून मुनगंटीवार यांना रात्रभर झोप लागणार नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. Mahavikas Aghadi Chandrapur
चंद्रपूर, यवतमाळ जिल्हातून महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि समर्थक या सभेला आणि मिरवणुकीला हजर होते. रखरखीत उन्हात झालेल्या जाहीर सभा झाली. या सभेचे अध्यक्ष आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे होते. मंचावर उपस्थित माजीमंत्री शिवाजीराव मोघे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी, ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवडे, माजी आमदार वामनराव कासावर, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार देवराव भांडेकर, राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष (शरदचंद्र पवार गट), संदीप गिऱ्हे, शिवसेना जिल्हाध्यक्ष (उबाठा), सुनील मुसळे आम आदमी पार्टी (वरिष्ठ नेते), दिलीप चौधरी, अध्यक्ष (संभाजी ब्रिगेड), सोहेल शेख जिल्हाध्यक्ष (समाजवादी पार्टी ), प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), रमेशचंद्र दहिवडे जिल्हा सचिव (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), देवानंद पवार माजी सरचिटणीस (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) यांची उपस्थिती होती. Mahavikas Aghadi Chandrapur
भावनिक आणि जातीय प्रचार करण्याचा विरोधकांनी जो प्रयत्न चालवला, त्याला यावेळी प्रतिभाताई धानोरकर यांनी सडेतोड उत्तर दिले. आता रडायचे नाही, तर लढायचे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.