Nirbhay Bano Sabha in Chandrapur देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे वक्ते 14 मार्च ला चंद्रपुरात येत आहे, गुरुवारी चंद्रपुरात निर्भय बनो सभेचे आयोजन आम्ही निर्भय चंद्रपूरकर तर्फे करण्यात आले आहे.
शहरातील नागपूर मार्गावर असणारे न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते , विचारवंत विश्वंभर चौधरी व कायदे तज्ञ, मानवाधिकार विश्लेषक ऍड. असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहे. Nirbhay Bano Sabha in Chandrapur
वाचा – पोलिसांच्या कारवाईने कुणाचे धाबे दणाणले?
देशात व राज्यात सुरू असलेल्या परिस्थिती वर अचूक मार्गदर्शन यावेळी हे दोन्ही वक्ते करणार आहे, सध्या राज्यात महापुरुषांचे होणारे अपमान, मीडियाची गळचेपी, जनतेच्या पैशातून सत्ताधारी करीत असलेली लूट, संवैधानिक संस्थेचा वापर, विरोधकांची मुस्कटदाबी, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, निवडणुकीत EVM चा वापर थांबविण्यासाठी, विद्वेष आधारित सांप्रदायिक ध्रुवीकरण अश्या विविध विषयांवर निर्भय बनो सभेत मार्गदर्शन होणार आहे. Nirbhay Bano Sabha in Chandrapur
सध्या राज्यात निर्भय बनो सभेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, सभा होऊ नये यासाठी सत्ताधारी दबाव टाकत आहे, काही ठिकाणी प्रमुख वक्ते निखिल वागळे यांच्यावर हल्ला सुद्धा करण्यात आला होता, मात्र त्यानंतर सुद्धा सर्व संकटांना सामोरे जात आज राज्यात या सभा निर्भयपणे पार पडत आहे.
वाचा – सोमवारी चंद्रपुरात बॉटनिकल गार्डनचे उदघाटन
चंद्रपुरातील निर्भय जनतेने या सभेत येत आपली निर्भयता दाखवीत हजारोच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही निर्भय चंद्रपूरकर च्या वतीने करण्यात आले आहे.