Pappu Deshmukh Arrested : देशमुखांच्या आंदोलनाची धास्ती, पोलिसांनी घेतले ताब्यात

Pappu Deshmukh arrested 12 मार्चला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालिकेच्या 542 कोटीच्या मल निस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे, मात्र 15 वर्षापूर्वी 100 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प बुडीत गेल्यावर सुद्धा प्रशासनाने त्यावर चौकशी लावली नाही आणि उलट पुन्हा दुसरा प्रकल्पाचे भूमिपूजन आज होणार आहे आम्ही चंद्रपुरातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रशासनाला दिला होता.

 

वाचा – लोकसभेसाठी कांग्रेसने हा उमेदवार द्यावा, इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत

12 मार्च रोजी देशमुख यांनी आंदोलन करू नये यासाठी रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, देशमुख यांनी यावेळी सांगितले की आधीच नागरिक प्रदूषणाने त्रस्त आहे, 100 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प बुडीत गेला त्याची चौकशी प्रशासनाने लावली नाही मात्र पुन्हा नवा 542 कोटींचा प्रकल्प सुरू होत आहे, जनतेच्या पैश्याची उघडपणे लूट सुरू आहे. Pappu Deshmukh arrested

 

आता पुन्हा शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खोदल्या जाणार आहे, आम्ही गप्प बसणार नाही चंद्रपूरच्या जनतेला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा पप्पू देशमुख यांनी दिला. विशेष बाब म्हणजे मलनिस्सारण व अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन चंद्रपूर मनपा हद्दीत न करता बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे करण्यात येत आहे.

सत्ताधारी पक्षावर विरोध करणारे पक्ष आता चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा उरले नाही, केवळ जनविकास सेना हाच पक्ष नागरिकांच्या हितासाठी सत्ताधारी पक्षाला घेरण्याचे काम करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!