Labor Movement 30 टक्के वेतनवाढ, समान काम समान वेतन NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा प्रदान करा अश्या प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनि 5 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचे दंड प्रशासनाविरोधात थोपटले आहे.
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील 15 ते 20 वर्षांपासून काम करीत आहे, कामगारांनी विविध माध्यमातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कामगारांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे 28 कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 ची स्थापना केली.
अवश्य वाचा : 10 वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम अपूर्ण
Labor movement समितीतर्फे सर्व वीज कंत्राटी कामगारांना 30 टक्के वेतनवाढ, nmr च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा व समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी 9 फेब्रुवारीपासून टप्प्यात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
5 मार्च ला मध्यरात्री पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला होता, त्यानुसार आज सकाळी 10 वाजतापासून चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रासमोर राष्ट्रवादी नगर येथे वीज कामगारांनी बेमुदत कामबंद धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. कामगारांनी आपल्या हिताच्या व हक्काच्या मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे, आपल्याला समान वेतन मिळावे अशी त्यांची रास्त मागणी प्रशासनाकडे आहे, मात्र त्यांच्या मागणीवर प्रशंसान कानाडोळा करीत आहे.