Vanchit bahujan aghadi चंद्रपुरातील बहुजन समाजाचे नेते व संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी आज वंचित बहुजन आघाडी पक्षात अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
वाचा – ते नवजात बाळ कुणाचे?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेले यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्षप्रवेश केला आहे, जर राज्यात महाविकास आघाडी सोबत वंचित ची युती झाली नाही तर तिन्ही पक्षाला याचा काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. vanchit bahujan aghadi
राजेश बेले यांच्या पक्षप्रवेश वेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य कुशल मेश्राम, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, ओबीसी नेते गोपाल राऊत, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर पश्चिम प्रा. डॉ. सोमाजी गोंडाणे, पूर्व चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष बंडू ठेंगरे, चंद्रपूर महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. Vanchit bahujan aghadi