Resignation of Prakash Devtale : कांग्रेसला प्रकाश देवतळे यांची सोडचिठ्ठी

Resignation of Prakash Devtale चंद्रपूर – जिल्हा कांग्रेस कमिटी ग्रामीण चे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

 

त्यांच्या राजीनाम्याने सध्या कांग्रेस पक्षात खळबळ उडवून दिली आहे, 29 मार्चला त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविला आहे. Resignation of Prakash Devtale

हे ही वाचा : चंद्रपुरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय विदर्भ पार्टीचा मोठा निर्णय

मागील 15 ते 20 वर्षांपासून प्रकाश देवतळे कांग्रेस पक्षात सक्रिय होते, 10 वते 12 वर्षे कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते, मात्र कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी भाजप पक्षासोबत युती करीत निवडणूक जिंकली होती, इतकेच नव्हे तर निवडणूक जिंकल्यावर देवतळे ह्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष सोबत आनंदोत्सव सुद्धा साजरा केला, त्याबाबत प्रसार माध्यमावर वृत्त प्रकाशीत झाल्यावर प्रदेश अध्यक्ष पटोले यांनी त्यांना पदावरून पायउतार केले होते. Resignation of Prakash Devtale

 

नंतर ते तेली समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी काम करू लागले, नुकतेच त्यांनी कांग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत चंद्रपुरात तेली समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी केली होती, मात्र लोकसभेची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना दिल्याने ते नाराज झाले, काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते व अखेर त्यांनी 29 मार्चला कांग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, पुढील 2 दिवसात मी राजकीय भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती त्यांनी दिली होती मात्र आजच राजीनामा आणि आजच त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला, म्हणजेच त्यांचा राजीनामा आणि पक्षप्रवेश हे सर्व आधीच ठरलं होतं. Resignation of Prakash Devtale

Prakash devtale in bjp

देवतळे म्हणाले की मी अनेक वर्षे पक्षात काम केलं मात्र नेहमी माझ्यावर अन्याय करण्यात आला, कांग्रेसने माझे राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, मी अनेक निवडणुकीत पक्षाला विजयश्री मिळवून दिला त्यानंतर सुद्धा पक्षाने माझ्यावर अन्याय केला, याकरिता मी पक्षाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी स्पष्ट केले. Resignation of Prakash Devtale

 

प्रकाश देवतळे हे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहे, देवतळे यांच्या राजीनाम्यावर सध्यातरी वडेट्टीवार यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवतळे यांच्या राजीनाम्याने पक्षाला काही फरक पडणार नाही अशी स्थिती सध्या कांग्रेस गोटात आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!