Shri Gajanan Maharaj Temple : श्री.च्या प्रगट दिनानिमित्त श्री.दर्शनासाठी व महाप्रसादासाठी असंख्य भक्तांची मांदियाळी

News34 chandrapur

गुरू गुरनुले

मुल – मुल वॉर्ड नंबर १४ येथे Shri Gajanan Maharaj Temple सदस्यांच्या पुढाकाराने रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी श्री. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या प्रगट दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रींचे मंदिर रोषणाईने सजविण्यात आले. सकाळी ७-३० ते ९-३० श्री.ची अभिषेक पूजा आरती १०-३० ते १२-३० पारायण व महाआरती दुपारी महिलांचे भजन व काला अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

सकाळ पासूनच श्री संत गजानन महाराज मंदिर स्थळी श्री.च्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी दिसून येत होती यामधे महिलांची संख्या लक्षणीय होती. सायंकाळी ५ वाजेपासून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. Shri Gajanan Maharaj Temple

 

रात्री १० वाजेपर्यंत सहपरिवार,मित्र परिवार अशा हजारो भक्त जणांनी श्री.च्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री गजानन महाराज मंदिराच्या समस्त सदस्यांनी आलेल्या समस्त भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी अनेक स्टॉल उभारण्यात आले होते. भक्तगण महिलांच्या व पुरुषांच्या गर्दीच्या रांगा फुलून दिसत असताना देखील भक्तांची सर्वतोपरी व्यवस्था व महाप्रसाद वितरण श्री.मंदिर सदस्यांकडून करण्यात आली.

 

यामधे मंदिर परिसरातील महिलांनी सुद्धा पुढाकार घेतला होता. श्रीच्या प्रगटदीन सेवाकार्यात बाबूभाई पटेल, बाळु सुरमवार, जीवन कोंतमवार, वसंतराव कामडी साहेब, प्रभाकर भोयर,अविनाश श्रिगिरवार, राकेश रत्नावार, किशोर चेपुररवार, राजू मांर्तीवार, मनीष कोंतमवार, सुरेश बुक्कावार, गणेश मांडवकर, गुरु गुरनुले, देवराव ढवास,प्रा. विजय लोनबले,युवराज चावरे, धनंजय चूदरी, राजू पटेल, अखिल गांगरेडिवार, बुक्कावार, खोब्रागडे सर,रामदास गोंगले, विशाल आक्केवार, प्रा.कऱ्हाडे, श्री.संगोजवार, गंगाधर कुंनघाडकर ,प्रा. रवी बुरांडे, शहाणे, राजू चल्लावार, एड. बबलू नागोषे, श्री.समर्थ सर, श्री घनश्याम येनुरकर, यांचेसह मंदिर परिसरातील अनेक युवक भक्त, सर्व महिलांनी प्रगटदीन सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.एकंदरीत श्री.संत गजानन महाराज परिसरात भक्तांची मांदियाळी लक्षणीय होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!