Strange manifesto of Lok Sabha candidate चंद्रपूर – सध्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात 15 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. प्रामुख्याने काँग्रेस, भाजप, वंचित अशा प्रमुख पक्षांमध्ये ही लढत आहे. अशात मात्र अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची चर्चा आहे. ती यासाठी की बरेच उमेदवार हे वीज, रस्ते, पाणी, विकास अशा अनेक गोष्टींचे आश्वासन घेऊन जनतेसमोर जातात. मात्र वनिता राऊत ह्या एक वेगळाच मुद्दा घेऊन जाणार आहेत.
प्रत्येक व्यक्तीला दारू पिण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रेशनच्या दुकानात स्वस्त दरात ही दारू मिळायला हवी. त्यातही दिवाळीच्या वेळी आनंदाच्या शिधासोबत उच्च दर्जाची व्हिस्की आणि बिअर शिधापत्रिकाधारकांना देण्यात यावी. अशी मागणी त्यांची आहे. जर लोकसभा निवडणुकीत आपण निवडून आलो तर खासदार निधीचा उपयोग करत आपण व्हिस्की, बिअर उपलब्ध करून देणार असे त्यांचे म्हणणे आहे. Strange manifesto of Lok Sabha candidate
सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी निवासी वनिता राऊत ह्या वर्ष 2019 मधून चिमूर विधानसभा निवडणुकीत उभ्या होत्या, त्यावेळी जिल्ह्यात दारूबंदी होती, राऊत यांनी मला निवडून दिल्यास मी सर्वप्रथम जिल्ह्याची दारूबंदी हटवित प्रत्येक बेरोजगारांना दारूचे परवाने व गाव तिथे बार असा जाहीरनामा त्यांनी निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केला होता, मात्र तेव्हा त्यांना यश आले नाही. Strange manifesto of Lok Sabha candidate
5 वर्षांनी राऊत ह्या आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे, प्रस्थापित पक्षांचे जाहीरनामे व आश्वासन अजून आले नसले तर राऊत यांनी आताच आपले मत जाहीरनामा रुपी व्यक्त केले आहे. Strange manifesto of Lok Sabha candidate
त्या म्हणाल्या की मी जर खासदार म्हणून निवडून आली तर बेरोजगारांना बार चे परवाने मी आपल्या खासदार निधीतून काढून देणार, सरकारने अंत्योदय शिधा धारकांना साड्या वाटप केल्या होत्या, त्यानंतर आनंदाच्या शिधा म्हणून 5 वस्तू दिल्या मात्र मी अंत्योदय शिधा पत्रिका धारकांना धान्य सहित व्हिस्की व बिअर देणार अशी घोषणा राऊत यांनी केली आहे.
लोकसभा क्षेत्रातील मतदार त्यांच्या या आश्वासनाला किती प्रतिसाद देणार हे मतदानानंतर कळेलचं.