Restricted flavored tobacco stocks चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू तस्करांचे नेटवर्कचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार झाले होते, मात्र पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी ते जाळे काढायला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात व्यापार करणारे तस्कर जयसुख व वसीम यांच्यावर आता कारवाईची गदा आणण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. Restricted flavored tobacco stocks
चंद्रपुरातील घुग्गूस येथील नकोडा गावात स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे 36 वर्षीय नदीम इकबाल जियाउद्दीन शेख यांच्या घरी धाड मारली, घराची झडती घेतल्यावर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांना आढळला.
वाचा – चंद्रपुरात माजी नगरसेविकेचा पती निघाला तंबाखू व्यवसायी
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मध्ये होला हुक्का शिशा, विमल पान मसाला, ईगल हुक्का, मजा, बाजीराव फ्लेवर, विमल, ब्लॅक लेबल, गोल्ड स्वीट सुपारी, फजश्री पान मसाला, असा एकूण 4 लाख 36 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
सदर साठा हा तंबाखू तस्कर वसीम झिमरी यांचा असल्याची कबुली आरोपी नदीम ने दिली, सदर साठा हा विक्री करण्यासाठी वसीम ने नदीम च्या घरी ठेवला होता. Restricted flavored tobacco stocks
स्थानिक गुन्हे शाखेने घुग्गूस पोलीस स्टेशनमध्ये आरोपी नदीम इकबाल व वसीम झिमरी यांच्यावर कलम 328, 188, 272, 273, 34 भांदवी सह कलम 30(2) 26(2) अश्या विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
वसीम झिमरी याचे नेटवर्क चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, मागील काळात वसीम वर अनेक गुन्हे दाखल झाले होते मात्र त्यानंतर सुद्धा त्याने हा धंदा सोडला नाही, वसीम ने आजच्या भावी पिढीला कॅन्सर च्या जाळ्यात ओढण्याचे काम केले आहे. Restricted flavored tobacco stocks
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि नागेश चतरकर, पोउपनी विनोद भुरले, धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, प्रशांत नागोसे व दिनेश अराडे यांनी केली.