Chief Minister Eknath Shinde in Chandrapur मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार दि. १२ मार्च रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.
दुपारी ४.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता मोरवा विमानतळ हेलिपॅड चंद्रपूर येथे आगमन व मोटारीने वन अकादमी चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. सायंकाळी ६ वाजता मोटारीने श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन चंद्रपूरकडे प्रयाण. Chief Minister Eknath Shinde in Chandrapur
वाचा – तर मुख्यमंत्री शिंदे यांना हे महागात पडणार
सायंकाळी ६.१५ वाजता बॉटनिकल गार्डनची पाहणी व फिरते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण व उद्घाटन. रात्री ८ वाजता मोटारीने कोतवाली वॉर्ड चंद्रपूरकडे प्रयाण. रात्री ८.०५ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांचे निवासस्थानी भेट. रात्री ८.१५ वाजता नागपूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री १०.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
काय आहे कार्यक्रम?
चंद्रपुरात 11 मार्चला विविध विकास कामाच्या भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते मात्र काही कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता, आज 12 मार्च ला मुख्यमंत्री शिंदे चंद्रपुरात येत आहे. सध्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
चंद्रपूर व बल्लारपूर येथील एकूण 1500 कोटीच्या विकासकामांचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. Chief Minister Eknath Shinde in Chandrapur
यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचा 270.13 कोटीचा अमृत 2.0 प्रकल्प, चंद्रपूर मनपाचा 542.05 कोटींचा प्रकल्प, SNDT महिला विद्यापीठाच्या 590 कोटीच्या इमारतीचे भूमिपूजन, 238.29 कोटीचे बॉटनिकल गार्डनचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडणार आहे.