प्रशांत गेडाम
Tractor tire burst accident सिंदेवाही शहरालगत ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर लाकड़ाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने 1 जागिच ठार तर 3 गंभीर जख्मी झाल्याची घटना 10 मार्चला रविवार ला दुपारी घडली.
रविवार ला दुपारच्या सुमारास कच्चेपार सिंदेवाही रोडवर लाकुड़ घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर चे समोर चे दोन्ही चाक अचानक फुटल्याने चालकाचे ट्रेक्टर वाहना वरुन नियंत्रण सुटले व वाहन एका झाडाला जाऊन धडकले ही धडक ईतकी जोरदार होती कि, यामध्ये उमेश अशोक आदे वय 32 राहणार महात्मा फुले चौक सिंदेवाही हा जागिच ठार झाला. Tractor tire burst accident
वाचा – चिकन खाल्ल्याने चंद्रपुरातील 41 पोलिसांना विषबाधा
ट्रॅक्टर चालक मुन्ना देवराव गावतुरे, हमाल अनिल सदाशिव मोहुर्ले व सुखदेव विट्ठल गावतुरे हे सर्व राहणार सिंदेवाही हे तिघेही गंभीर जख्मी झाले. याची माहिती पुलिस स्टेशन सिंदेवाही ला मिळताच पोलीस ठाणेदार चव्हाण आपल्या पथकासह घटना स्थळी जाऊन ट्रॅक्टर मध्ये फसलेल्याना जेसीबी च्या सहाय्याने बाहेर काढले. लगेच जखमीना शहरातील ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.