Two Wheeler fancy number : तुमच्या दुचाकी वाहनाला हवा फॅन्सी क्रमांक? बघा ही बातमी

Two Wheeler fancy number उपप्रादेशिक परिवहन कर्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील  दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एम.एच. -३४, CJ-०००१ते एम.एच.-३४,CJ-९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

वाचा – चंद्रपुरात आचारसंहितेचे उल्लंघन?

ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल, त्यांनी परिवहन कार्यालयात 26 मार्च 2024 पर्यंत (दुपारी 4)  अर्ज सादर करावेत.

वाचा – चंद्रपूर लोकसभेसाठी कुणी भरला उमेदवारी अर्ज?

 

तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्क ( DD उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांचे नावे ) विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. Two Wheeler fancy number

 

सदर मालिका चालु असतांना  वाहन ४.० प्रणाली कार्यान्वीत झाल्यांनतर बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नविन मालिका दिनांक 27 मार्च 2024 पासून सुरु करण्यात येईल. Two Wheeler fancy number

 

प्राप्त होणारे अर्ज दुपारी  4 वाजेपर्यंत स्विकारले जातील व 26 मार्च रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास खालील पध्दतीने क्रमांक जारी करण्यात येतील. 27 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता बंद लिफाफे  उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!