Vanchit bahujan aghadi candidate चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवार आता एकमेकांविरोधात टीका टिप्पणी करण्यात रमले आहे, मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी थेट भाजप विरोधात समाजमाध्यमावर बदनामी केली म्हणून पोलिसात तक्रार दिली आहे.
बल्लारपूर येथील बामणी प्रोटिन्स कंपनी चे प्रदूषण वाढल्याने राजेश बेले यांनी त्याविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिली होती, प्रदूषण मंडळाने तात्काळ कारवाई करीत कंपनी बंद पाडली, त्याविरोधात भाजप प्रणित भारतीय मजदूर संघटनेने राजेश बेले यांची सोशल मीडियावर अपप्रचार करीत बदनामी केली. Vanchit bahujan aghadi candidate
आरोपात काय?
फेसबुकवर गोंदे नामक इसमाने तथाकथित पर्यावरणवादी, स्वतःला समाजसेवक समजणारे राजेश बेले यांनी बामणी प्रोटिन्स कंपनीविरुद्ध खोट्या तक्रारी दिल्या, प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार देत कंपनीला टाळे ठोकण्याचे काम बेले यांनी केले, कंपनी बंद पडल्याने 500 कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे, याला जबाबदार राजेश बेले आहे, त्यांच्या विरोधात कामगार कुटुंबामध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे. Vanchit bahujan aghadi candidate
प्रदूषणाच्या नावाखाली कंपनीला बेले यांनी ब्लॅकमेल केले, मात्र कंपनीने विरोध केल्यावर त्याविरुद्ध खोट्या तक्रारी करण्यात आल्या, यामुळे कामगारांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यामुळे भविष्यात त्यांच्या हातून चुकीच्या घटना घडू शकतात.
हे ही वाचा : चंद्रपूर लोकसभेतील उमेदवारांना मिळाली ही पॉवर
त्याविरोधात 30 मार्चला राजेश बेले यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही अश्या अपप्रचाराला बळी पडणार नसल्याची माहिती दिली. Vanchit bahujan aghadi candidate
ते म्हणाले की प्रस्थापित पक्षांनी फक्त भ्रष्टाचाराचे राजकारण केले आहे, छोटे पक्ष फोडन्याचे काम भाजपने केले आहे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे, त्याचा बुरखा आम्ही फाडणार आहो, जंगलात महोत्सव कसे झाले? बांबू कसे जळाले, स्टेडियम व बस स्टॅण्ड कसे कोसळले, हे जनतेसमोर आम्ही मांडणार आहो अशी प्रतिक्रिया बेले यांनी दिली. Vanchit bahujan aghadi candidate
बेले यांनी बदनामी व धमकी विरोधात रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.