Vanchit Bahujan Aghadi candidate Rajesh Bele चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीची चुरस हळूहळू वाढत असून 27 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
हे ही वाचा : चंद्रपुरात आमदार प्रतिभा धानोरकर यांचं भव्य स्वागत
19 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत किती उमेदवार मैदानात असणार हे 31 मार्चनंतर कळणार आहे.
चंद्रपुरातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले हे अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. Vanchit Bahujan Aghadi candidate Rajesh Bele
जिल्ह्यात वाढत्या प्रदूषणावर त्यांनी आपला आवाज नेहमी बुलंद केला आहे, तेली समाजातील राजेश बेले याना समाजाचा वाढता पाठिंबा आहे. Vanchit Bahujan Aghadi candidate Rajesh Bele
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांनी 1 लाखांच्या वर मते घेत चांगलीच टक्कर दिली होती.
27 मार्चला वंचित बहुजन आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या व असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत राजेश बेले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे..