Vanchit bahujan aghadi 27 मार्च लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. Vanchit bahujan aghadi
गांधी चौकातून निघालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पोहचली, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, तेली समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी सदर रॅलीत आपली उपस्थिती दर्शविली. Vanchit bahujan aghadi
वंचित चे उमेदवार बेले यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली की लोकसभा क्षेत्रातील विविध समाजाचा मला पाठिंबा आहे, भाजप व कांग्रेस पक्षाला जनता त्रासली आहे, बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास टाकत मला उमेदवारी दिली, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात वंचित आघाडीचा उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित आहे.