Vijay wadettiwar on pratibha dhanorkar पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांग्रेसने आपला उमेदवार म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर यांचं नाव जाहीर केलं.
हे ही वाचा – चंद्रपुरात येताच आमदार धानोरकर यांना अश्रू अनावर
Vijay wadettiwar on pratibha dhanorkar 25 मार्च रोजी धानोरकर यांचं विमानतळावर आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले, मात्र प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार धानोरकर यांनी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचं नाव टाळलं.
यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की कदाचित त्या माझं नाव विसरले असतील, नावात काही ठेवलं नाही पक्ष महत्वाचा.
Vijay wadettiwar on pratibha dhanorkar 27 मार्च रोजी आमदार धानोरकर ह्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यावेळी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार हे उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींना तिकीट मागितली होती, मात्र ऐनवेळी पक्षाने विजय वडेट्टीवार यांना लोकसभा लढण्याच्या सूचना दिल्या मात्र त्यांनी नकार दिल्यावर उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना मिळाली.